मोठी बातमी ! शिवसेना वसई विरार संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, करण्याची मागणी.... सौ.रूचिता अमित नाईक, मा.शहरप्रमुख*
*महानगरपालिकेत उडालेला धुव्वा व तिकीटे विक्री कथित ऑडिओ क्लिप व्हायरल मुळे कारवाईची मागणी...
वसई विरार ता,२१ :- वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी पैसै घेऊन तिकीटांची विक्री करत असल्याचा आरोपांना बळ देणारे प्रकरण समोर आले आहे. वसई विरार महानगरपालिका निवडणूक निकालाचे पडसाद पडले असून वसई विरार जिल्हातील संपूर्ण शिवसेना कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्याची मागणी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या कडे केली आहे.
वसई विरार महानगरपालिकेत जिल्हाप्रमुख यांनी पैसै घेऊन तिकीटे विकल्याचा आरोप होत असताना त्यांची कॉल रेकॉर्डिंग हा व्हायरल होत आहे. महिला आघाडी हि या मध्ये सामिल असुन बाहेरील उमेदवारा विरोधात आवाज न उठवता गप्प राहण्यासाठी जिल्हाप्रमुख यानी मोठी रक्कम दिल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षाकडुन निवडणुकीतील उमेदवार व पदाधिकारी यांना मोठी रक्कम देण्यात आली होती ते हि या वरिष्ठानी गायब केल्याचा आरोप होत आहे.
शिवसेना महिला आघाडी मधिल पदाधिकारी व महिलांनी खुप मेहनत घेतली वेळ आली तर घर संसार मुले सोडुन शिवसेना पक्षासाठी धावुन आल्या आहेत. या निवडणुकीत ज्या उमेदवारांना कधी बघितले हि नाही अशा उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे.
काही ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतानाही त्या ठिकाणी भाजप सोबत तडजोड करुन शिवसेना विरोधात भाजप उमेदवार दिल्याचे आरोप होत आहेत. भाजप चे उमेदवार हि त्या ठिकाणी निवडुण आले आहेत व शिवसेना उमेदवारांचा दारून पराभव झाला.
यासर्व पराभवाची शिवसेनेकडून गंभीर दखल घेण्यासाठी सर्व शिवसैनिक एकवटले असुन शिवसेनेला अवघ्या एक जागी विजय मिळाला आहे. याचा जिल्हा कार्यकारिणीवर ठपका ठेवत संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी रूचिता नाईक यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment