आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न !!
गुळीनदी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, रुखनखेडा (प्र. चोपडा) संचलित आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय, मचाले ता. चोपडा यांच्या स्थापनेच्या २५ वर्षपूर्ती रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री ॲड. उज्ज्वल जी. निकम साहेब (खासदार, राज्यसभा, दिल्ली) यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अरुण भाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष) हे होते.
कार्यक्रमात शाळेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. उद्घाटनप्रसंगी बोलताना पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम साहेब यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, या विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवोद्गार काढले. भविष्यातही शाळेने शैक्षणिक प्रगतीसोबतच मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अरुण भाई गुजराथी यांनी शाळेच्या प्रगतीचा गौरव करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ॲड घनश्याम निंबाजी पाटील यांनी केले तर माजी विद्यार्थी श्री दिनेश ठाकूर शास्रज्ञ साऊथकोरिया व सौ सिंधू बाविस्कर सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड रुपेश पाटील यांनी प्रभावीपणे केले. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रौप्य महोत्सवानिमित्ताने विशेष सत्कारात श्री अरुण धनसिंग पाटील यांनी शाळेची पायाभरणी केली त्यामुळेआणि पंचवीस वर्षापासून श्री प्रविण आबाजीराव पाटील यांनी मुख्याध्यापक म्हणून चांगली कामगिरी केली त्याबद्दल दोघांचा संस्थेकडून विशेष सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण देवराव निकम, उपाध्यक्ष श्री जगन्नाथ दामू पाटील, सचिव ॲड घनश्याम निंबाजी पाटील, संचालक हिरालाल लखा पाटील, अशोक चैत्राम पाटील, डॉ रवींद्र वामन निकम, राजेंद्र भीमराव पाटील, इंद्रभान मच्छिन्द्र पाटील, देवकीनंदन पंढरीनाथ पाटील, हेमलाल निंबाजी पाटील, सिंधू हेमलाल पाटील, पंडित निंबाजी पाटील, खंडू दौलत पाटील, सतीश जगन्नाथ गुजर, ॲड रुपेश घनश्याम पाटील, तालुक्यातील मान्यवर कैलास पाटील, माजी आमदार चोपडा रोहित दिलीपराव निकम, दिलीपराव सोनवणे माजी शिक्षक आमदार चंद्रहास गुजराथी, चेरमन पीपल्स बँक शांताराम भावलाल पाटील, मा जी प सदस्य सौ विजयाताई पाटील, जीवनभाऊ चौधरी, विनायक रामदास चव्हाण, सौ इंदीराताई पाटील, प्रवीण गुजराथी, निलीमाताई पाटील, शशिकांत देवरे, सुनील जैन, नारायण शालिग्राम पाटील, गोकुळ पाटील, हितेंद्र देशमुख, शशिकांत पाटील, नंदकिशोर पाटील, डि पी पाटील, डॉ मनोज सनेर, पांडुरंग सोनवणे, मिलिंद सोनवणे, सुनील पाटील संतोष धोंडू पाटील, गोपाल किशीनाथ महाजन, बाळासाहेब सोनवणे, धनंजय पाटील, अमृत वाघ, विवेक पाटील, कोकिळाबाई पाटील, डॉ रोहन पाटील डॉ प्रसाद पाटील, मुख्याध्यापक शिक्षकवृंद, आजी माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण देवराव निकम उपाध्यक्ष श्री जगन्नाथ दामू पाटील सचिव श्री घनश्याम निंबाजी पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य - ॲड रुपेश घनश्याम पाटील,
चोपडा, (+91 99752 06939)
No comments:
Post a Comment