उरण, पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल !!
** कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. बुधवारी त्यांनी पनवेल, उरणमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कार्यकर्त्यांत अधिक उत्साह असतो. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन उमेदवार उभे केले आहेत," असे महेंद्रशेठ घरत म्हणाले.
"उरणमध्ये प्रचंड असंतोष आहे. दिबांचे नाव अद्यापही विमानतळाला दिले गेले नाही. पाणी समस्याही गंभीर आहे. रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मैदानांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे उरण, पनवेलच्या जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळेल," असा विश्वास कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, बाळाराम पाटील, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, वसंत काठावले, नंदराज मुंगाजी, मुरलीधर ठाकूर आणि कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment