रण येथे मुंबई विद्यापीठाचा उडान महोत्सव २०२६ चे आयोजन !!
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण व उरण एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित उडान महोत्सव २०२६ हा शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना व गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी उडाण महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येते. या महोत्सवात पोवाडा गायन,पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व आणि क्रिएशन रायटिंग या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. बळीराम एन.गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी यूईएस महाविद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, कोकण ज्ञानपीठ संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश मुथा, प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे, प्राचार्या डॉ. मीनाक्षी गुप्ता, मिलिंद पाडगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा.व्हि.एस. इंदुलकर हे परिश्रम घेत आहेत.या महोत्सवात उत्तर रायगड जिल्हा व नवी मुंबई परिसरातील एकूण २५ महाविद्यालयातील ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या आहेत.हा महोत्सव यूईएस महाविद्यालयाच्या परिसरात संपन्न होणार आहे.
No comments:
Post a Comment