Wednesday, 21 January 2026

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यासाठी आमरण उपोषण !!

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यासाठी आमरण उपोषण !!

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यासाठी सिडको भवन कार्यालय समोर सीबीडी बेलापूर येथे सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ पासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाला नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे संघटक किरण केणी व प्रविण मुठ्ठेनवार बसले आहेत. आजचा तिसरा दिवस सुरू असुन सिडकोच्या प्रशासनाने उपोषणकर्ते आंदोलक व त्यांच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा न केल्यास उद्या चौथ्या दिवसापासून इतरही प्रकल्पबाधित आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत. प्रामुख्याने २०१९ नंतर निष्कातीत झालेल्या घरांच्या घरमालकांना घरभाडे भत्ता व प्रोत्साहन भत्ता  ५००/-₹द्यावा.

शून्य पात्रता ठरवून सिडकोने जी घरे नाकारली आहेत त्या घरांना सुध्दा घरे मंजूर करा.
२०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करुन मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी.विमानतळ प्रकल्प बाधितांच्या मुलांना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात या मुख्य मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...