कल्याण वनविभागाचा भोंगल कारभार चव्हाट्यावर ; ठेकेदार व वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी !
कल्याण, प्रतिनिधी (राजेंद्र शिरोशे) :
संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवगाव चे अध्यक्ष श्री दिलीप टेंबे हे जंगलामध्ये गस्त घालत असताना त्यांना वन विभागाकडून वनविभागाच्या सीमारेषेवर पिलर चे बांधकाम चालू असल्याचे आढळून आले परंतु त्या पिलर मध्ये आत जंगलातील दगड टाकून व त्याच्यावर ग्रेट पावडरचा लेप लावून निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना संयुक्त वनविभाग समितीचे नाव गावचे अध्यक्ष श्री दिलीप टेंबे यांनी सदर पिलर फोडून पाहणी केली असता त्यात नुसते दगड टाकून वरती गिरीट पावडरचा लेप लावून शासनाचा निधी हडप करण्याच्या हेतूने ठेकेदार व वन विभाग अधिकारी यांनी संगनमत करून शासनाचा निधी हडप करण्याचा उद्दिष्टाने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, असे येथील वनविभागाचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांचे म्हणणे असून सदर झालेल्या कामाची विभागीय चौकशी होऊन ठेकेदार व वनक्षेत्रपाल आखाडे तसेच वनपाल मुरलीधर जागरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच येत्या काही दिवसात वनमंत्री मा गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप टेंबे उपाध्यक्ष संदेश टेंबे यांनी सांगितले आहे तरी असा भोंगळ कारभार करणारे ठेकेदार व वनविभागाचे अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment