Friday, 23 January 2026

सैन्यदल,प्रशासकीय सेवा परीक्षा मार्गदर्शन प्रकल्प !!

सैन्यदल,प्रशासकीय सेवा परीक्षा मार्गदर्शन प्रकल्प !!

हुतात्मा प्रतिष्ठान आयोजित सैन्यदलातील संधी, प्रशासकीय परीक्षा ह्या पूर्ण वर्षभर चालणाऱ्या मार्गदर्शन *प्रकल्पाचे उद्घाटन आज पद्मश्री श्री गजानन माने (इंडियन नेव्ही -१९७१ भारत पाक युद्ध, कराची बंदर नेस्तनाबूत करणारी नौसेना तुकडी) यांचे हस्ते कानविंदे सभागृह, डोंबिवली पुर्व येथे शुक्रवार २३ जानेवारी २०२६ रोजी झाले.*

*२३ जानेवारी ते २३ डिसेंबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प तज्ञ मार्गदर्शकांचे नियंत्रणात असेल.*

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षिका, प्राध्यापिका यांना संबोधित करत असताना त्यांनी यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., परीक्षा देताना अभ्यासक्रम, अवांतर वाचन याची माहिती विद्यार्थ्यांना कशी आवश्यक आहे, आपल्या सकारात्मक विचारात आत्मविश्वास कसा वृद्धिंगत होतो हे खास शैलीत सांगितले तसेच प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटर डोंबिवली पूर्व येथे विद्यार्थ्यांनी अवश्य भेट द्यावी कारण भारतीय सैन्याची यशोगाथा बघून राष्ट्रभक्ती व आत्मनिर्भर भारत कसा विकसित झाला आहे ह्याची जाणीव होईल.

हुतात्मा प्रतिष्ठानने या प्रसंगी एक ३० मिनिटांची "ऑब्जेटीव टाइप सरप्राइज टेस्ट" घेतली यात ५८ विद्यार्थी, ०२ शिक्षिका, ०१ प्राध्यापिका ०७ पालक यांनी भाग घेतला.

प्रश्नपत्रिका राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांच्या धर्तीवर होती.  प्रा.डॉ.सुनिल कांबळे यांनी मार्गदर्शन परिसंवाद आणि सर्व प्रश्नांचे उत्तरे व त्यांचे स्पष्टिकरण केले. 

हुतात्मा प्रतिष्ठानचे सचिव श्री. सुनिल मोकाशी यांनी प्रकल्पाचे उद्दिष्ट आपल्या अध्यक्षीय भाषणात विषद केले.

शिवाई बालकमंदिरच्या सौ.सरिता फडतरे, सौ.नयना पाटील आणि टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राध्यापिका सौ.चेतना भुजंग, प्रगती कॉलेजचे प्राध्यापक श्री लक्ष्मण इंगळे उपस्थित होते..
कार्यक्रमाचे नियोजन श्री.गणेश पाटील,श्री खाडे व विठु माऊली, स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शन श्री.हर्षद परांजपे यांनी केले.

प्रसिद्धी करिता - अश्विनी निवाते (+91 96193 05835)

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...