शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित उरण शहर शाखेतर्फे अभिवादन !!
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित शुक्रवार दिनाकं २३ जानेवारी २०२६ रोजी रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उरण शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले, हे वर्षे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्यामुळे उरण शहरात शिवसेना शहर शाखेतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी साहेबांच्या तमाम शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या आठवणी जागवल्या.
या वेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, माजी विभागप्रमुख सूर्यकांत दरणे, महिला आघाडीच्या शहर संपर्क संघटिका व नगरसेविक श्रीमती वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, शहर संघटिका विना तलरेजा, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, विभाग संघटिका रूपा सिंग, शाखा संघटिका लता राठोड, अल्पसंख्यांक सेलच्या शहर अध्यक्ष शादाब शेख, महिला अध्यक्षा मुमताज भाटकर, उपाध्यक्ष सायरा खान, सलीमा शेख, युवती सेनेच्या कु यशस्वी म्हात्रे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष घनश्याम कडू, माजी शहर संघटक महेश वर्तक, शाखाप्रमुख मिलिंद भोईर, इस्माईल शेख, अनिल पाटील, कमलाकर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे, अप्पा पठारे, मेहता, उमेश गीध, शिवा म्हात्रे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा चिटणीस ओमकार घरत, तालुका संघटक कुणाल पाटील, संदेश पाटील, अभिषेक भोईर, उपशाखाप्रमुख फतेह खान, उपशहर अधिकारी सर्वेश गवस, सिद्धेश म्हात्रे, सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठया उपस्थित होते
No comments:
Post a Comment