नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधिताचे आमरण उपोषण स्थगित !!
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधिताचे गेली चार दिवस सुरु असलेले आमरण उपोषण सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गोयल यांच्या दालनात सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आले आहे.
अनेक मागण्या मान्य करण्यात आले असून त्यात घरभाडे भत्ता व प्रोत्साहन भत्ता देण्याचे सिडकोने मान्य केले आहे मात्र त्यासाठी गावातील घरांच्या तोडक कामाची तारीख निश्चित करावी लागेल. शुन्य पात्रता अथवा नाकारलेली घरे यांचे सबळ पुरावे सादर करणे आवश्यक आहे. प्रकल्प बाधितांच्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे, प्रशिक्षणासाठी विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनी आपली नाव नोंदणी करुन प्रशिक्षण घ्यावे, सिडकोने ही व्यवस्था केली आहे.आमरण उपोषणाच्या या मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन तुर्त स्थगिती करण्यात आले आहे. प्रकल्प बाधितांच्या वतीने चर्चेत उपोषणकर्ते किरण केणी व प्रविण मुठ्ठेनवार सह नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, कमिटी सदस्या चांगुणा ताई डाकी, कुंदा ताई भोपी, किसान सभा अध्यक्ष कॉ. रामचंद्र म्हात्रे व सेक्रेटरी कॉ.संजय ठाकूर व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विभागातील अधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment