वीर वाजेकर महाविद्यालयात मतदार जागृती !
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०२६ च्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कॉलेज, फुंडे येथे मतदार जागृती भित्तीपत्रक चे उद्घाटन उपजिल्हाधिकारी तथा मतदान अधिकारी आवीष कुमार सोनोने ह्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भित्तिपत्रके इलेक्ट्रोल लिटरसी क्लब व राज्यशास्त्र विभागा च्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते.याप्रसंगी मुलांचे तहसीलदार उद्धव कदम यांनी मतदानाची शपथ वाचून नव मतदार विद्यार्थ्यांनाही शपथ घ्यायला लावली. तसेच उप जिल्हाधिकारी सोनोने यांनी उपस्थित नव मतदार विद्यार्थी यांना मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे साठी आवाहन केले तसेच वीर वाजेकर महाविद्यालय नेहमीच शासकीय उपक्रमांना आणि मतदार जागृती कार्याला प्राधान्याने सहकार्य करते त्याबद्दल महाविद्यालयाचेही आभार मानले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
"My India My Vote" या थीमसोबत "भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे" हा विषय ठेवण्यात आला होता.या रॅलीत उपजिल्हाधिकारी तथा मतदान अधिकारी आविष कुमार सोनोने , तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. उद्धव कदम, नायब तहसीलदार प्रभाकर नवाळे यांच्यासह कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, प्रा. राम गोसावी, डॉ. राजकुमार कांबळे, डॉ संदीप घोडके, उपप्राचार्य गजानन चव्हाण, डॉक्टर चिंतामण दिंधळे, प्रा. श्रीकांत गोतपागर, डॉ. सुजाता पाटील प्रा. भूषण ठाकूर प्रा प्रांजल भोईरयांनी सहभाग घेतला.या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनएसएस ,एनसीसी व डी एल एल ई च्या २१० विद्यार्थ्यांनी रॅलीत सक्रिय सहभाग घेतला. सदरच्या रॅलीत विद्यार्थी सहभागी झाले मतदार जागृतीचा संदेश प्रसारित केला. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने अशा जागृती उपक्रमांद्वारे लोकशाहीतील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले
No comments:
Post a Comment