माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न !
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज नवीन शेवा येथे शिकणाऱ्या १० वी (S S C) व १२ वी (H S C) आर्टस् व सायन्स च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे संस्थापक माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी विध्यार्थ्याचा मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, दहावी व बारावी ही आपल्या जीवनाची पहिली व दुसरी पायरी आहे, येथे आपण यशस्वी झालात तर जीवनात पुढे जीवनात यशस्वी होत जाल म्हणुन थोडे दिवस टीव्ही, मोबाइल पासून दूर राहा व खुप अभ्यास करून गुणवंत होऊन आपले, गुरुजनांचे, आईवडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा आशा शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उरण तालुका संघटक बी एन डाकी, संस्थेचे चे उपाध्यक्ष व उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, नवीन शेवा सरपंच सोनल निलेश घरत, केंद्रप्रमुख म्हात्रे सर, गावंड सर, अमृत ठाकूर, मुख्याध्यापक संतोष म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले तर विद्यार्थी यांनी आपले निरोपाचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, श्री सरस्वती पूजन व स्वागत गीतांनी करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शैक्षणिक भेट देण्यात आली.
सदर कार्यक्रमास नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष व उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, शाखाप्रमुख शैलेश भोईर, पोलीस पाटील मनोहर सुतार, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment