उरण शिवजयंतीच्या अध्यक्षपदी अभिषेक भोईर व उपाध्यक्षपदी हर्षद शिंदे यांची निवड !
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्याबाबत शिवसेना शहर शाखेमध्ये नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीत २०२६ च्या शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते अभिषेक भोईर यांची व उपाध्यक्षपदी हर्षद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, ही निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक भोईर व उपाध्यक्ष हर्षद शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्य कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश राहळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, माजी विभागप्रमुख सूर्यकांत दरणे, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, जेष्ठ कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment