नागरी संरक्षण नवी मुंबई समूहात ४९ नव्या स्वयंसेवकांचा समारोपीय प्रशिक्षण वर्ग संपन्न !!
कल्याण प्रतिनिधी: ता. १०, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मान्यतेने जानेवारी दि. ०५ ते ०९, २०२६ या कालावधीत नागरी संरक्षण कल्याण कार्यालयातील प्रशिक्षण हॉल येथे प्राथमिक वर्ग क्र. ०१/२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण ४९ सामान्य नागरिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला होता. दररोज दु. १३.०० ते सायं. १७.३० या वेळेत हे प्रशिक्षण घेण्यात आले.
आज अंतिम दिवशी श्री. अनिल गावित, सउनि तसेच श्रीम. संकुतला राय, मानसेवी निदेशक यांनी व्याख्याने व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली.
समारोपीय कार्यक्रमात श्री. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे यांनी नव्या स्वयंसेवकांना संघटनेत सामील होण्याची शपथ देऊन त्यांना मौलिक, उद्बोधक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री. रमेश गोरे, उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–२ (कडोम), श्री. करमबिरसिंग भुर्जी, उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–४ (नवी मुंबई), श्री. कमलेश श्रीवास्तव, उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–३ (उल्हासनगर ते बदलापूर) तसेच श्री. बिमल नथवानी, उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–१ (ठाणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नव्यानेच संघटनेत भरती झालेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. सगीर खान, प्र.वि.क्षे.व. तसेच श्रीम. रोहिणी गोलतकर हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बेल्हेकर, स्वयंसेवक यांनी केले व शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्रशिक्षणार्थींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
No comments:
Post a Comment