अंगारकी संकष्टी निमित्त टिटवाळा महागणपती मंदिरात नागरी संरक्षणतर्फे प्रथमोपचार केंद्र; २० स्वयंसेवकांचा चोख बंदोबस्त !
कल्याण प्रतिनिधी : ता. ९, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने मा. उपनियंत्रक श्री विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने व निर्देशानुसार मंगळवार दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त महागणपती मंदिर, टिटवाळा (ठाणे) येथे भाविकांच्या सेवेसाठी दोन ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे प्रस्थापित करण्यात आली होती.
भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी सहकार्य करणे तसेच गर्दीमध्ये कोणास दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली होती. प्रथमोपचार केंद्रासाठी दोन पाळ्यांमध्ये कर्तव्य ठेवण्यात आले होते.
पहिली पाळी सकाळी ०७.०० ते १४.०० व दुसरी पाळी १४.०० ते २२.०० या वेळेत प्रत्येकी १० + १० असे एकूण २० नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्तामध्ये उत्कृष्टरीत्या कर्तव्य पार पाडले.
यावेळी उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे मा. श्री विजय जाधव साहेब यांनी प्रथमोपचार केंद्रास भेट देऊन स्वयंसेवकांचे मनोबल वाढवले व प्रेरणात्मक मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग गढरी यांचीही उपस्थिती लाभली.
नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या या नियोजनबद्ध व सेवाभावी कार्यामुळे भाविकांना सुरक्षित व शिस्तबद्ध दर्शन घेण्यास मोठी मदत झाली. सदर कार्याबाबतची माहिती व छायाचित्रे माननीय महोदयांच्या अवलोकनार्थ सविनय सादर.
खुप छान नागरी संरक्षण दल ठाणे चे कार्य.
ReplyDelete