प्रभाग क्रमांक १२३ चे महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांच्या प्रचारार्थ डॉ.प्रितम मुंडे यांचा नागरिकांशी घरोघरी जाऊन संवाद ; अनिल निर्मळे यांना विजयी करण्याचे आवाहन !!
घाटकोपर, (केतन भोज) : प्रभाग क्रमांक १२३ चे भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल निर्मळे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांच्या समवेत प्रभाग क्रमांक १२३ मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन डोअर टू डोअर संवाद साधून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.तसेच यावेळी डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रभागातील मतदार नागरिकांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्या सोबत मुंबई भाजप सचिव प्रतिक कर्पे, मंडळ अध्यक्ष संतोष गांजले, वॉर्ड अध्यक्ष महेश गुप्ता, शिवसेना समन्वयक मंगेश मोहिते आणि महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment