Friday, 9 January 2026

महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चना संजय भालेराव व सौ.अलका गणेश भगत यांच्या प्रचार सभेला उसळला प्रचंड जनसागर !!

महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चना संजय भालेराव व सौ.अलका गणेश भगत यांच्या प्रचार सभेला उसळला प्रचंड जनसागर !!

दोन्ही महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित ; मंत्री भरतशेठ गोगावले

घाटकोपर, (केतन भोज) : प्रभाग क्रमांक १२७ आणि प्रभाग क्रमांक १२६ च्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अलका गणेश भगत व सौ.अर्चना संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची जाहिर सभा आमदार राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिल्पा बिल्डिंग मागे गणेश मंदिर शेजारी मैदान याठिकाणी पार पडली. या सभेत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रमुख अतिथी म्हणून नागरिकांना मार्गदर्शन करताना प्रभाग क्रमांक १२७ आणि प्रभाग क्रमांक १२६ च्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. अलका गणेश भगत व सौ.अर्चना संजय भालेराव या दोन्ही उमेदवारांना कमळ या चिन्हांवर मतदान करून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून प्रभागातील घराघरात महायुतीचा विचार व विकासकांचा अजेंडा पोहोचवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याठिकाणी या जाहिर सभेला उपस्थित होते. या जाहिर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उसळेला जनसागर पाहून याठिकाणी सौ.अलका गणेश भगत व सौ.अर्चना संजय भालेराव या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास वाटतो, असे यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...