Thursday, 8 January 2026

जनसेवेचा खरा वारसदार डॉ.रियाताई संजय जाधव !!

जनसेवेचा खरा वारसदार डॉ.रियाताई संजय जाधव !!

** वसा वडिलांचा ध्यास रुग्णसेवेचा आदर्श शिवकन्येचा 

        छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीत जिथे साक्षात छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक झाला.त्या रायगड जिल्ह्यातील अतिशय गरीब कुटुंबातील एक तरुण म्हणजे डॉ.संजयजी जाधव छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन जेव्हा उघड्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लढतो आणि आपले सर्वस्व समाजसेवेसाठी अपर्ण करतो आई वडिलांची जनसेवेची जोडली गेलेली जनसेवेची नाळ कायम ठेऊन नालासोपारा सारख्या दुर्गम भागातून गोरगरिबांची सेवा करून उत्कृष्ट जिवनाची यशोगाथा म्हणून अनाथांचे नाथ बनून रंजल्या गांजल्यांची सेवा करत असताना आपल्या वडिलांचे स्वप्न म्हणजे जनसेवेचा खरा वारसदार कसा असावा तर तो म्हणजे शिवकन्या डॉ  रिया संजय जाधव यांच्या सारखाच असावं डॉक्टरी सारखे उच्च शिक्षण घेऊन  तरुणींना एक वेगळी प्रेरणा निर्माण करणारी जनसेवेसाठी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन जनसेवेचा आणि वडिलांचा खरा वारसदार अस म्हणायला वावगठरणार नाही. कारण एक चांगला समाजसेवक निस्वार्थ, करुणाशील, समर्पित आणि समस्या सोडवणारा असावा, जो प्रसिद्धी किंवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गरजूंच्या समस्या समजून घेतो, त्यांना मदतीचा हात देतो आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्यासाठी त्याला धैर्य, समजूतदारपणा आणि समस्या हाताळण्याची क्षमता लागते.
             समाजसेवकाचे गुणधर्म म्हणजे निस्वार्थ सेवावृत्ती प्रसिद्धी, पद किंवा पैशाची अपेक्षा न ठेवता केवळ समाजासाठी काम करणे.करुणा आणि सहानुभूती गरजूंच्या रुग्णाच्या व गरीबांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्या परिस्थितीत स्वतःला झोकून देणे. अगदी हेच आता डॉ. रिया संजय जाधव करताना पहायला मिळत आहे. समस्या सोडवण्याची वृत्ती केवळ मदत करणे नव्हे, तर मूळ समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे.
                 धैर्य आणि चिकाटी पहिली तर कठीण परिस्थितीतही हार न मानता सातत्याने प्रयत्न करत राहणे. नगीनदास पाडा परिसरात आपल्या पासून महिलांशी व जनतेशी प्रभावी संवाद कौशल्य लोकांशी मोकळेपणाने बोलणे, त्यांचे दुःख ऐकून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे. हे सातत्याने सुरू आहे.  एक डॉ महिला म्हणून समस्या हाताळण्याची क्षमता  भावनिकरित्या गुंतून न जाता, वस्तुनिष्ठपणे परिस्थिती हाताळणे.समानतेची भावना जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थितीचा विचार न करता सर्वांना समानतेने मदत करणे.सामाजिक जाणीव समाजातील समस्या आणि गरजांची खोलवर जाणीव असणे.तोच खरा समाजसेवक.
              समाजसेवक कसा असावा तर गरजूंना प्रत्यक्ष भेटणे: केवळ कागदोपत्री मदत न करता, गरजूंना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या समजून घेणे. सामाजिक कामात नवीन ज्ञान आणि कौशल्यांचा वापर करणे.थोडक्यात, एक खरा समाजसेवक हा एक दूरदृष्टी असलेला, समर्पित आणि कृतीशील व्यक्ती असतो, जो समाजाच्या प्रगतीसाठी स्वतःला झोकून देतो. आणि आपल्या विधानाच्या समाजसेवेचा वसा कायम ठेऊन खरा वारसदार म्हणून डॉ. रिया संजय जाधव यांच्याकडे आता जनता याच नजरेने पाहत आहे. याचे समाधान अखंड रायगड जिल्ह्यातील जनतेला आणि नालासोपारा मधील नागरिकांना अभिमान वाटत आहे.त्यांनी घेतलेल्या आणि त्यांच्या हातून होत असलेल्या जनसेवेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा....!

शब्दांकन: श्री दीपक तु.मांडवकर 
संकलन - श्री. शांताराम ल. गुडेकर

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...