झेड.पी. शाळा फुंडे येथे लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीतर्फे हेल्मेट वाटप !
उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी यांच्या वतीने झेड.पी. शाळा, फुंडे येथे हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.लहान वयापासूनच रस्ते सुरक्षेचे महत्त्व समजावे व सुरक्षित प्रवासाच्या सवयी लागाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास लायन भूमिका सिंग (अध्यक्षा), लायन मोनिका चौकर (सचिव), लायन सीमा घरत (माजी अध्यक्षा), लिओ गोपाळ विटकर व लायन सोनिया पाटील यांची उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक रमणिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व शालेय कर्मचारीवर्गाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.यावेळी विशेष अतिथी म्हणून उमेश घरत तसेच श्रीमती निर्मला मच्छिंद्र घरत (गट शिक्षण अधिकारी) उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थी, पालक व शालेय प्रशासनाकडून प्रशंसित झाला असून, सुरक्षित व जागरूक समाज घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
No comments:
Post a Comment