रक्तदान आणि अन्नदान हे पुण्याचे काम : महेंद्रशेठ घरत
** साई मंदिरात महेंद्रशेठ घरत यांनी केले रक्तदान!
उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील वहाळच्या साईमंदिरात गुरुवारी महेंद्रशेठ घरत यांनी रक्तदान केले. साई मंदिरात अन्नदान आणि रक्तदान हा दुग्धशर्करा योग साधणारे महेंद्रशेठ घरत हे राजकीय आणि सामाजिक समतोल साधणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. हे त्यांनी आज केलेल्या रक्तदानातून दाखवून दिले. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले', असे म्हणतात ते महेंद्रशेठ घरत यांना तंतोतंत लागू होते.
त्यांनी साई मंदिरात रक्तदान शिबिरात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी गेली अनेक रक्तदान करतोय. अनेकांचे जीव त्यामुळे वाचतात. त्यामुळे रक्तदान आणि अन्नदानासारखे पुण्य नाही. त्यामुळे मी आज दोन्ही गोष्टी एकाच वेळी करतोय. यात मला आनंद आहे. साई मंदिराच्या व्यासपीठावर अनेक समाजोपयोगी उपक्रम आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे."
श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी वहाळच्या साईमंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी महेंद्रशेठ घरत यांचे स्वागत केले आणि रक्तदान केल्याबद्दल अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment