कवयित्री, लेखिका उषा घोडेस्वार यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित !
शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या संचालिका कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्यासाठी हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर, (सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चरवळीची संघटना) तसेच थियासॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री शक्ती जागृती मेळाव्यानिम्मित दिनांक 15 मार्च 2026 रोजी आदर्श मंगल कार्यालय ,नागपूर येथे या हिरकणी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर निताताई ठाकरे, सह उद्घाटक उपमहापौर लीनाताई हाथीबेड यांच्या हस्ते करण्यात आले, अध्यक्षा अनिताताई पांडव, स्वागताध्यक्ष डॉ. स्मिता मेहेंत्रे(अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर), प्रमुख अतिथी पोलिस सायबर क्राइम श्रद्धाताई ढोमणे, डॉ. नीलम जैन, सरिता राणेकर, रीता चंद्रिकापुरे, प्रगती मानकर, रुपाली ढोमणे, रेणू गुप्ता, अंजली पोटूवार व संपूर्ण संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली हा पुरस्कार वितरण करण्यात आला.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य व सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलाना शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, भेटवस्तू व प्रत्येकांना एक रोपट देऊन सन्मानित करण्यात आले हा मौल्यवान संदेश होता. सर्वांच्या उपस्थितीत या सोहळा अतिशय सुरळीतपणे पार पडला.
वृत्त - प्रमोद सुर्यवंशी
No comments:
Post a Comment