यु. ई. एस. लिटिल सिड्स इंटरनॅशनल प्री-स्कूल मध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा !!
उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : भारतीय परंपरे नुसार मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा ह्या शुभदिवसापासून होते, हिच परंपरा जपताना, गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी यु. ई. एस. लिटिल सिड्स इंटरनॅशनल प्री-स्कूल मध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सरस्वती मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारुन पुजा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, खजिनदार ऍड.अपूर्वा ठाकूर, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, समन्वयक, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख, माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, पीटीएचे उपाध्यक्ष तसेच शिक्षक गण, पालक आणि विदयार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका शिक्षिकेने गुढीपाडव्याचे महत्व सांगितले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांनी सर्व उपस्थितांना पाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सिनिअर के. जी. च्या विदयार्थ्यांनी गाण्याच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संगीत शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ६ वी व ८ वीच्या विदयार्थ्यांनी सरस्वती वंदना म्हटली.
दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही गुढीपाडव्याच्या दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांकडून पाटीवर सरस्वीतचं चित्र काढायला लावून त्यावर फुले व हळद कुंकू वाहून पाटीपूजन करायला सांगण्यात आले. रांगोळी, सजावट व सर्व उपस्थितांचे स्वागत, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी केलं. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे विद्यार्थी व पालकांना मिठाई तसेच नवीन प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांना नवीन अभ्याक्रम असलेला एनईपी पुस्तकांचा संच व स्कूल बॅग देण्यात आली. अशा रितीने यु. ई. एस. लिटिल सिड्स इंटरनॅशनल प्री-स्कूल मध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला
No comments:
Post a Comment