Wednesday, 11 March 2026

टाटा पॉवरने खांडी आणि भिवपुरी येथील दोन शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थी आणि ५० शिक्षकांसाठी विज्ञान मेळाव्याचे केले आयोजन !

टाटा पॉवरने खांडी आणि भिवपुरी येथील दोन शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थी आणि ५० शिक्षकांसाठी विज्ञान मेळाव्याचे केले आयोजन !

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांमध्ये विज्ञानाब‌द्दलची ओढ निर्माण करण्यासाठी टाटा पॉवर सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग कंपनीने नुकतेच खांडी आणि भिवपुरी परिसरात संवादात्मक 'विज्ञान मेळावे आयोजित केले होते, मालेगाव (खांडी परिसर) येथील 'सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळा' आणि 'गौळवाडी माध्यमिक शाळा' (भिवपुरी परिसर) येथे हे कार्यक्रम पार पडले, विज्ञानाशी संबंधित कृतीशील उपक्रम आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून शेकडो वि‌द्यार्थी यामध्ये सहभागी झाले.

ही मोहीम 'राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचत, शाश्वतता आणि पर्यावरणपूरक नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरच्या 'क्लब एनर्जी' (Club Enerji) उपक्रमांतर्गत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या 'नॅशनल ऊर्जा मेळा' आणि 'महाराष्ट्र ऊर्जा मेळा' या संकल्पनांतून या मोहिमेची प्रेरणा मिळालेली होती. या मेळाव्यांनी वि‌द्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा व्यावहारिक वापर अनुभवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमधील सर्जनशीलता, कुतूहल आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याला प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन, पोस्टर बनवणे, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, वैज्ञानिक विषयांवरील रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्य अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा, पर्यावरण संवर्धन आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर यांसारख्या वास्तविक समस्यांवरील आपले विचार आणि समज मांडण्यास मदत झाली.

मालेगाव येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थी आणि ३० शिक्षक सहभागी झाले होते, सुमारे ५० विद्यार्थ्यांनी ऊर्जा, शाश्वतता आणि दैनंदिन तंत्रज्ञानाशी संबंधित संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विज्ञानाच्या प्रतिकृती सादर केल्या, रांगोळी स्पर्धेमध्ये १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञान आणि पर्यावरणाचे विषय कल्पकतेने मांडले, मालेगावच्या पोलीस पाटलांनीही या कार्यक्रमाला भेट दिली; त्यांनी वि‌द्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यातील विज्ञानाप्रती असलेला उत्साह आणि नवनिर्मितीचे कौतुक केले.

तसेच, गौळवाडी गावातील गौळवाडी माध्यमिक शाळेत पार पडलेल्या विज्ञान मेळाव्यात ४०० हून अधिक विद्यार्थी आणि २० शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला, सुमारे ५० विद्यार्थ्यांनी प्रदूषण, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि शाश्वत पद्धती यांसारख्या विषयांवर आधारित विज्ञानाच्या प्रतिकृती सादर केल्या, विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा, निबंध लेखन आणि पोस्टर बनवण्यातही सहभाग घेतला, ज्यामुळे विज्ञानातील त्यांची जिज्ञासा आणि आवड वाढण्यास मदत झाली. प्रदूषण आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या विषयावरील प्रश्न उत्तर पथनाट्याने विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मदतीने पर्यावरणापुढील आव्हाने कशी सोडवता येतील, याचा विचार करण्यास प्रवृत्त केले.

या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाब‌द्दलची वाढती ओढ दिसून आली. अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बु‌द्धिमत्तेचा मूलभूत वापर यांसारख्या संकल्पना मांडल्या, असे उपक्रम विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करण्यास आणि वास्तविक जगातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करतात.

या उपक्रमांच्या माध्यमातून, टाटा पॉवर ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण आणि कृतीशील शिक्षणाला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची जिज्ञासा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास लहान वयापासूनच निर्माण होण्यास मदत होत आहे

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...