Thursday, 19 March 2026

मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद !!

मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्या अस्तित्वासाठी सदैव पुढाकार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ मार्च रोजी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड वरुन मनसे या पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात केली.त्या नंतर सर्व जिल्ह्यात सदस्य नोंदणीला सुरवात झाली.मनसेच्या या सदस्य नोंदणीला उरण तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी, रिक्षाचालक, कामगार वर्ग विशेष करून तरुण मंडळी आपली उपस्थिती दाखवून मनसेचे तालुकाध्यक्ष ऍड.सत्यवान भगत यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेत आहेत.मनसेच्या सदस्य नोंदणीला उरण मध्ये मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मनसेला तरुण वर्गांचा मोठा पाठिंबा व प्रतिसाद उरण मध्ये पहावयास मिळत आहे.

९ मार्च रोजी किल्ले रायगडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी म हाराजांच्या पावनभूमीत किल्ले रायगड येथे प्राथमिक सदस्य नोंदणीची सुरुवात केली. या सदस्य नोंदणीला राज्यात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे.सध्या राज्यातील राजकारणामुळे मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात येऊ घातले आहे. त्यामुळे मराठी माणूस आणि मराठी भाषा यासाठी मनसेचे नेते राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवत आहेत. त्याच्या या विचारातून प्रेरित झालेल्या उरण तालुक्यातील विद्यार्थी, रिक्षाचालक व कामगार वर्ग विशेष करून तरुण मंडळी यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. मनसेच रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे तालुकाध्यक्ष ऍड. सत्यवान भगत यांच्या उपस्थितीत आपली प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेतली आहे. उरण मधील विविध ठिकाणी ही नोंदणी केली जात आहे.यावेळी तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, उरण शहराध्यक्ष धनंजय भोरे, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, सुप्रिया सरफरे, दिनेश हळदणकर आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शब्द पंढरीचे वारकरी; कवी श्रीराम यांच्या घरी साहित्याची गुडी !!

शब्द पंढरीचे वारकरी; कवी श्रीराम यांच्या घरी साहित्याची गुडी !! लोणावळा परिसरातील ग्रामीण कवी श्रीराम यांनी यंदा एक अनोखा आणि प्...