उत्साहवर्धक १२५ व्या १७ तारखेच्या कार्यक्रमाने प्रभावित केले
- जयु भाटकर. सदस्य साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र
उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) :
" माझ्या माहितीप्रमाणे सतत १० वर्षे ५ महिने उरण सारख्या छोट्या शहरात १२५ विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन कविसंमेलनांचे कार्यक्रमाचे नियोजन करणे महाराष्ट्रात क्वचितच घडले असावे." असे विचार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य जयू भाटकर यांनी उरण तालुक्यातील पाले येथे झालेल्या साहित्य संमेलनात आपले विचार मांडले.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ ,संमेलनाध्यक्ष साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल बी पाटील , जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ ," बंडखोर " गोपाळ शेळके,रायाप्पा माशाळे, सुभाष कुडके, महाराष्ट्राची गझलकारा ज्योत्स्ना राजपूत,लवेंद्र मोकल, सिध्देश लखमदे , वैशाली भिडे, चंद्रकांत मुकादम, प्राचार्य साहेबराव ओहोळ इ.ची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कॅप्टन योगेश म्हात्रे,वसंत चिरलेकर,स.ज.पाटील, ए.डी.पाटील, कृष्णा पाटील, प्रशांत दि.म्हात्रे इत्यादी २५ समाजसेवक आणि २५ कवी ,अजय शिवकर,अक्षता गोसावी, दिप्ती कुलकर्णी, जनार्दन सताणे,स़तीश पवार, निलेश म्हात्रे, नरेश पाटील, अनिल भोईर.किशोर पाटील, शिवप्रताप पंडित,अनंत पाटील ,रमण पंडित, हेमंत पाटील, दौलत पाटील, यांनी कविता सादर केल्या.
रामचंद्र म्हात्रे यांच्या गंध मातीचा आणि न.ग.पाटील यांच्या आनंदाचे दोहे,मोग-याचा गंध या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. हा सोहळा अतिशय आनंदाचा झाला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिलीं.
No comments:
Post a Comment