केडीएमसी प्रशासनातील कथित भ्रष्टाचाराविरोधात उपोषण !!
पालिका मुख्यालयासमोर जाहीर मुंडण
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनातील कथित अनियमितता, भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रहिवासी व शिवसेना ग्राहक संरक्षण पक्षाचे पदाधिकारी ऋतुकांचन शंकर रसाळ यांनी ११ मे पासून उपोषण सुरूकेले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या ‘४ ज’ विभागातील सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या कार्यपद्धतीविरोधात स्थानिक नागरिकांकडून वारंवार गंभीर तक्रारी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही खासगी विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना राज बिल्डर अँड डेव्हलपर्स राजप्रीतम चतुर्वेदी रहिवाशांवर अन्याय केला जात असल्याचेही आंदोलनकरते ऋतूकांचन रसाळ यांनी सांगितले आहे.
तसेच काही प्रकरणांमध्ये स्थानिक नागरिकांच्या मालकीची घरे जाणीवपूर्वक “धोकादायक” घोषित करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
याशिवाय संबंधित गृहनिर्माण प्रकल्पांबाबत आवश्यक माहिती फलक नसणे, रेरा नोंदणी क्रमांक उपलब्ध नसणे यामुळे फ्लॅट खरेदी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचेही रसाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या सर्व प्रकरणांबाबत नगर रचना विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत यापूर्वी सहा दिवसांचे आमरण उपोषण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता पुन्हा त्यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे.
मागण्या मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर “आमरण उपोषण तर सुरू आहेच शिवाय रसाळ यांनी प्रशासनाच्या विरोधात जाहीर मुंडन आंदोलन केले आहे. त्यामुळे यांच्या या उपोषणा संदर्भात प्रशासन काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment