Saturday, 16 May 2026

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती !!

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती !!

*चाळीसगाव, दि. 16 मे 2026*

आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव व अंतर्गत गावांमध्ये विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

*वरिष्ठांचे मार्गदर्शन*  
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या सूचनेनुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित भोसले व डॉ. सुप्रिया पाटील, आरोग्य पर्यवेक्षक किरण बेलदार, आरोग्य सहाय्यक शितोळे, आरोग्य सहाय्यक कुलकर्णी व एलएचव्ही दराडे सिस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले.

*मादुर्णे उपकेंद्रात जनजागृती*  
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत मादुर्णे उपकेंद्रात हस्त पत्रिका वाटप करण्यात आले. डेंग्यू विषयी बॅनर दाखवून लोकांना डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व स्वच्छतेचे महत्त्व यावर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

*उपस्थित मान्यवर*  
यावेळी सीएचओ रामटेके मॅडम, आरोग्य सेवक संदीप चौधरी, आरोग्य सेविका ठाकूर सिस्टर, आशा सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत व डासोत्पत्ती होऊ देऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !! टिटवाळा, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत ...