डोंबिवलीहून पंढरपूरला निघाली सायकलने दिंडी !!
डोंबिवली, प्रतिनिधी :
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील गणपती मंदिर येथून आज 8 जुलै बुधवारी सकाळी पंढरपूर येथील सायकल रिंगण संमेलन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी 16 जणांची एक महिला पुरुषांची टीम रवाना झाली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री नंदू परब, नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यासाचे डॉ. सुनील पुणतांबेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे तसेच डोंबिवलीतील अनेक नागरिक उपस्थित होते. सायकल सखी ग्रुप (संस्थापिका अध्यक्षा सौ सुवर्णा राणे) आणि सायकल डोंबिवली क्लब (संस्थापक डॉ सुनील पुणतांबेकर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. या पंढरपूर जाणाऱ्या सायकल दिंडीत 20 वर्षाच्या तरुणांपासून 72 वर्षे वृद्धापर्यंत सर्वजण सामील झाले होते. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, देवदर्शन, बेटी पढाव बेटी बचाव असा हा सायकल वारीचा उद्देश होता. पाऊस, वारा याची तमा न बाळगता हे सर्वजण 12 जुलै रोजी पंढरपूर येथील येथील सायकल वारी आणि संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून हजारो सायकलस्वार या रिंगण संमेलन सोहळ्यासाठी पंढरपुरात दरवर्षी येत असतात. या पंढरपूर वारीसाठी स्वतः सायकलस्वारांनी आणि बसने जाणाऱ्यांनी खर्चासाठी वर्गणी काढली असून काही दानशूर लोकांनी पण यासाठी मदत केली आहे. सदर वारी सोबत अँब्युलन्स आणि इतर आवश्यक वस्तू व सायकल वारकऱ्यांचे सामान ठेवण्यासाठी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर हे सायकलस्वार तीन दिवस व 385 किलोमीटरचा खडतर प्रवास करून 10 जुलै रोजी सायंकाळी/रात्री पंढरपूर येथे पोहचणार आहेत. 11/12 जुलै रोजी पंढरपूर परिक्रमा, रिंगण, संमेलन इत्यादी कार्यक्रम झाल्यावर बसने परत येणार आहेत. अंदाजे 40 महिला, पुरुष हे बसने 11 जुलै रोजी डोंबिवलीहून निघून या सायकल रिंगण संमेलनात सहभागी होणार आहेत.
सायकल वारी दिंडी साठी सहभाग घेतलेल्यांची नावे :-
१) मुकुंद कुलकर्णी ७२ वर्षे
२) शंभू नारायण सिंग ७२ वर्षे
३) नयना आगरकर ६४ वर्षे
४) प्रशांत विसपुते ६३ वर्षे
५) वर्षा महाडिक ५८ वर्षे
६) सारंग मुळे ५४ वर्षे
७) अश्विनी कारंडे ५३ वर्षे
८) भीमाशंकर बिराजदार ५१ वर्षे
९) विलास वैद्य ५० वर्षे
१०) मेघेश कुलकर्णी ५०वर्षे
११) शोभा चौगुले ४७ वर्षे
१२) तेजल थोरवे ४६ वर्षे
१३) योगिता थोटांगे ४३ वर्षे
१४) विजय लहाने ३८ वर्षे
१५) रविना जाधव ३६ वर्षे
१६) मेघ छेडा २० वर्षे
शिवाय गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी याच पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे दुसरी 33 जणांची तुकडी एमआयडीसी गणपती मंदिर येथून रवाना होणार आहे. यातही तरुण, वृद्ध महिला, पुरुष सहभागी होणार आहेत. याचे नेतृत्व एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या अध्यक्षा सौ हर्षल सरोदे करणार आहेत. संपूर्ण डोंबिवलीतून या पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी एकूण अंदाजे 50 जण जात आहेत. दरवर्षी यात वाढ होताना दिसत आहे. शिवाय या सायकल रिंगण संमेलन सोहळ्यासाठी खास बसने पण डोंबिवलीकर जात आहेत. एकंदर पंढरपूर सायकल वारीसाठी डोंबिवलीकरांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.
या सर्वांना पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी उपस्थित सर्वांनी खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या 🌹
No comments:
Post a Comment