Wednesday, 3 June 2020

लोणावळा शहरात जोरदार वाऱ्याने पडली झाडे!

लोणावळा शहरात जोरदार वाऱ्याने पडली झाडे!


लोणावळा प्रतिनिधी- निसर्ग वादळामुळे लोणावळ्यात जोरदार वारा सुरू झाल्याने शहरभरात सर्वत्र झाडे पडली आहेत.

कोकण किनारपट्टीवर निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याने त्याचा परिणाम घाटमाथ्यावरील लोणावळा व खंडाळा परिसराला देखिल बसला आहे.

मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा परिसरात पावसाची संततधार व वारा सुरू झाल्याने बुधवारी सकाळी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपोलो गॅरेज समोर तसेच तुंगार्ली चौकात, नारायणीधाम शेजारी, रायवुड भागात तिन ठिकाणी, सिध्दार्थनगर, हिलटाॅप खंडाळा भागात नऊ झाडे पडली आहेत.

लोणावळा नगरपरिषदेने तात्काळ आप्तकालिन तीन पथक तयार केली आहेत. त्यांच्या मदतीने पडलेली झाडे जेसीबी मशिनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान वीज वितरण कार्यालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

लोणावळा नगरपरिषदेने लोणावळाकर नागरिकांना घराबाहेर न पडण्यासोबत खबरदारी घेण्याची सुचना दिली आहे. दोन वाहनांच्या माध्यमातून शहरात सुचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...