ठाणे जिल्ह्यातील मुंम्ब्रा पोलिसांनची दुसऱ्यांदा दमदार कामगिरी...!
दिवा, अमित जाधव: दिनांक ७, ८ जुलै २०२० रोजी मुंब्रा व दिवा येथे जबरी चोरीच्या झालेल्या घटना यात जवळजवळ ४लाख ६५हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. यातील सर्व प्रकरणांचा तपास गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने करून १) रफिक मलिन शेख, २) वसीम माजीम खान, ३) रिजवान अख्तर शेख, ४) जुबेर जाफर कच्छी, सर्व राहाणार मुंब्रा, तसेच आरोपी मामे आरीब अहमद मुनीर शेख व कैस उर्फ मोहसीन मुल्ला सामान व रोख रक्कम असा एकूण ४लाख १७ हजार रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश.
१८ जुलै २०२० रोजी पर्यंत सर्व आरोपींना ताब्यात घेऊन, मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत मुब्रा आणि दिवा येथील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील चोरांना सापळा रचून शिताफीने अटक केले एकूण ४लाख १७ हजार रुपये चा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर कारवाई विवेक फणसाळकर पोलीस आयुक्त ठाणे शहर , मा.श्री.सुरेश मेकला पोलीस सह आयुक्त, मा. श्री.अनिल कुंभारेअप्पर पोलिस आयुक्त, मा.श्री.सुभाष बोरसे उप आयुक्त, मा.श्री.सुनील घोसाळकर, मा.श्री.मधुकर कड मुंब्रा व.पो.नी., यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि मंगेश बोरसे, पो. ओ.नी साहेब कांबळे, पो.ह दीपक जाधव, पो.ना तेजस परब, पो.शी राकेश यशी , अंकुश वैद्य, मयूर लोखंडे, प्रमोद जमदाडे, स.पो.नी हनुमंत शिरसागर हनुमंत शिरसागर, अनिल मोरे, संजय घोडके, संतोष सस्कर, व पो.शी विष्णू राठोड,पो.उप.नी.संजय गळवे, किशोर वैरागकर, तसेच स.पो.नी शहाजी शेळके, अमोल यादव, तुषार पाटील, कमलाकर भोईर, अब्दुल तडवी, जगदीश गावित,रमेश माळी भूषण खैरनार त्यांनी केली असून पुढील तपास चालू आहे.

No comments:
Post a Comment