विरोधी पक्षाच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये !,"महाविकास आघाडी सरकारचा जीआर"
राज्यातील कोरोना परिस्थितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना जास्तच दिसत आहे. यात आणखी एक भर पडली आहे. राज्य सरकारने काढलेला जीआर आता याचं कारण बनला आहे. विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षाच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा जीआर राज्य सरकारने काढला आहे. इतकंच नाही तरी त्यांच्या दौऱ्यांनाही शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहण्याचा उल्लेख या जीआरमध्ये आहे.
विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या जीआरचा भाजप सरकारच्या 11 मार्च 2016 च्या परिपत्रकाशी संबंध आहे. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी देखील विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेश काढला होता. त्यामुळे भाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला.

No comments:
Post a Comment