नालासोपारा येथे प्रवाशांचे रेल रोको !
'एसटी स्टॅण्ड बंदचा फटका रेल्वेला'
वसई, विष्णु गुप्ता : मुंबईतील नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. नालासोपारा एसटी स्टँड बंद केल्यामुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर आले आणि आम्हाला रेल्वेने प्रवास करू द्या अशी मागणी या संतप्त प्रवाशांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर अनलॉकमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.
नालासोपारा रेल्वे स्थानकातून सध्या संतप्त प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाजूला नालासोपारा एसटी स्टँड आहे. तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी आपला मोर्चा नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे वळवला. स्थानकात प्रवाशांनी रेल्वे रोखून आम्हालाही रेल्वेने प्रवास करून द्यावा अशी मागणी केली. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर हे सर्व प्रवासी ट्रॅकवर उतरले, त्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीने प्रयत्न करून त्यांना बाजूला काढलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा रेल्वेसेवा सुरळीत सुरु झाली आहे.

No comments:
Post a Comment