मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक आणि घरगुती श्रीगणेशोत्सवा साठी मुरबाड पोलीसांचे फर्मान !!
*काही नियम आणि काही सूचना *
मुरबाड (मंगल डोंगरे) : संपूर्ण जग गेले पाच महिने कोरोना महामारी संकटात जिवन जगत असुन सण,उत्सव काळात या रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये.त्यासाठी या काळात जागोजागी होणारी गर्दी, जमाव टाळणे हे पुर्णपणे आपल्या हातात आहे.जेणे करून आपण कोरोना संकट टाळु शकतो. त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारने घालुन दिलेले नियम ,अटी व सुचनांचे पालन करण्यासाठी मुरबाड पोलीस स्टेशन मध्ये नुकताच सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांची मिटींग घेण्यात आली होती.या मिटींग मध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपती उत्सव हा खालील नियमांचे आणि सूचनांचे पालन करून यावर्षी उत्सव साजरा करावा.असे आवाहन
मुरबाड पोलिसांनी केले आहे.
१)सार्वजनिक श्रीगणेशोत्सव दीड किंवा अडीच दिवसाचा करण्याचा प्रयत्न करावा.
(अनेक मंडळांनी यापुर्वीच हे मान्यही केले आहे.)
तसेच मुर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नसावी.शक्यतो दोन दिवस आधीच मुर्ती आणावी.
२)कुणीही बाहेरील पाहुणा बोलावू नये.जेवणावळ, भंडारा ठेवू नये.
३)नातेवाईक बोलावू नये.घरगुती पद्धतीने आणि स्थानिक पातळीवर कार्यक्रम करावेत.
४)आपणही कुठे पाहूणे म्हणून दर्शनासाठी जाऊ नये.
५)आगमनावेळेस दोन लोकांनी मुर्ती आणावी.आगमन मिरवणूक काढू नये.
६)आरतीला पाच पेक्षा जास्त लोक नसावेत.
७)कोणताही मोठा अथवा बाहेरचा कार्यक्रम आयोजित करू नये.तसेच दर्शन रांग न लावता सोशल मिडियाच्या माध्यमातून दर्शन व्यवस्था करावी.
८)विसर्जन मिरवणूक काढु नये.
९)संध्याकाळ होण्याच्या आत विसर्जन करावे.
१०)अंधारात चाचपडत विसर्जन करू नये.
११)विसर्जन शक्यतो कृत्रिम तलाव करून करावे.
किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी विसर्जनाला जाऊ नये.महिला, लहान मुलांना बरोबर नेवू नये.
१२)विसर्जनावेळीची आरती घरीच करावी.
१३)विसर्जन स्थळी आरती करू नये.
१४)जुगार, भांडणात सापडलेल्या लोकांची गय केली जाणार नाही.
१५)गौरी विसर्जन करताना महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
१६)लहान मुलांना बरोबर नेवू नये.
या शिवाय उत्सवकाळात वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
देव हा भाव भक्तीचा चाहता आहे,यावर्षी आपण सर्वांनी अगदी साधेपणाने,सरकारी नियम पाळून उत्सव साजरा करावा.
यावर्षीचा आपला उत्साह आणि आनंद आपण पुढल्या वर्षीसाठी राखून ठेऊ या.
अशाप्रकारे यावर्षीचा श्रीगणेशोत्सव साजरा करून आपण स्वत:,आपले कुटुंब, नातेवाईक, आपला परीसर आणि आपले गाव कोरोना संसर्ग होण्यापासून वाचवू या.
*आपल्या एखाद्या लहानशा चूकीमुळे बाप्पाला आणि गौरीमातेला दोष नको लागायला, याची आपण काळजी घेऊ या.*घरच्या घरी संपूर्ण उत्सव साजरा करुयात.असे नियम आणि सुचना यावेळी करण्यात आल्या आहेत.



No comments:
Post a Comment