प्रयोगशील शिक्षक योगेंद्र बांगर यांची तिसरीच्या विद्यार्थ्यां साठी मराठी विषय "संबोध "या पुस्तकाची स्वखर्चाने निर्मिती !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुरबाड येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी तिसरीच्या विद्यार्थ्यां साठी मराठी विषय *"संबोध"* या पुस्तकाची स्वखर्चाने निर्मिती केली आहे. तसेच मराठी , गणित , इंग्रजी या विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या आहेत. ही सर्व पुस्तके शाळेत मोफत वाटण्यात येणार आहेत. तर मराठी विषय *"संबोध"* हे पुस्तक मुरबाड तालुक्यातील 29 केंद्र शाळांना मोफत वाटण्यात येणार आहेत.
आता पर्यंत कोणीही न तयार केलेल्या मराठी विषयाचा *संबोध* प्रयोगशील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे .मराठी विषय चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी पुस्तकात मुरबाडी बोली भाषेचा वापर केला आहे. व मुलांच्या भावविश्वाचा सहज संबंध जोडला जावा म्हणून त्या पद्धतीचे फोटो सुद्धा छापण्यात आले आहेत.
एखादा घटक परिपूर्ण रितीने कायम स्वरुपी समजावून सांगणे व तो समजण्यासाठी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष अनुभव देणे यासाठी *संबोध*हा घटक वापरला जातो तो फक्त गणित विषयासाठी उपलब्ध आहे.
माझे पुस्तक ही भावना वाढीस लागावी , विद्यार्थी व पालक यांना सहजरित्या अध्ययन करून स्वाध्याय सोडवता येतील अशा प्रकारची रचना स्वाध्याय पुस्तिकेत केली आहे. मराठी भाषेतील संबोध सोप्या भाषेत चित्रमय पद्धतीने सुगम रीतीने करण्याचा अभिनव प्रयोग या पुस्तकात केला आहे. केंद्र शाळा मुरबाड नंबर -2 ,,दोनचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे योगेंद्र बांगर यांना यासाठी चांगले सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment