Monday, 17 August 2020

आम आदमी पक्षाचे सचिन जोशी क.डो.म.पा. चे सहायक आयुक्त अरुण वानखेडे यांची भेट घेऊन P1 P2 नियम रद्द करण्याची मागणी केली !!

आम आदमी पक्षाचे सचिन जोशी क.डो.म.पा. चे सहायक आयुक्त अरुण वानखेडे यांची भेट घेऊन P1 P2 नियम रद्द करण्याची मागणी केली !!


कल्याण : लाॅकडाऊन मध्ये व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान पाहता दुकान उघडी ठेवण्यासाठी  महानगरपालिकेने केलेला P 1 आणि P 2 चा नियम रद्द करावा. यामुळे गर्दीचे देखिल विभाजन होऊन एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही आणि व्यापाऱ्यांना देखिल दिलासा द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते 'श्री. सचिन जोशी' यांनी महानगरपालिकेकडे केली होती. 

आज  त्या  मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी व लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी म्हणून सहाय्यक आयुक्त "श्री. अरुण वानखेडे"  यांची महानगरपालिकेत भेट घेतली असता ते म्हणाले कि आयुक्तांकडे P 1 आणि P 2 नियम रद्द करण्यासाठी प्रस्ताव तयार करून दिला आहे. त्यावर आयुक्त साहेबांची सही झाली की ताबडतोब आदेश काढण्यात येतील. यावर 'श्री. सचिन जोशी' यांनी आयुक्तांनी कल्याण डोंबिवली येथील व्यापाऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी कोरोना समुपदेशन समितीचे अध्यक्ष 'श्री. अनिल काकडे' हे देखिल उपस्थित होते.

'आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते'
 श्री. सचिन जोशी मो. 9324065203 

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...