चोपडा वार्ताहर :-
रोटरी क्लब चोपडा तर्फे स्वातंत्र्य दिना चे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व देशप्रेम लहानपणा पासूनच रुजावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी कोरोना मुळे राष्ट्रभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा न घेता एकल सोलो गायन स्पर्धा घेण्यात आली, मुलांनी घरातूनच तयार करून पाठवलेले गाण्याची व्हिडीओज, लहान गट (५वी ते ७वी) व मोठा गट (८वी ते १०वी) अश्या प्रत्येक गटातून एक प्रमाणे प्रत्येक शाळेमधून दोन दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, एकूण 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री जीवन चौधरी गटनेते नगरपालिका चोपडा,रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव,सचिव रुपेश पाटील,ज्येष्ठ रोटे.एम.डब्ल्यू.पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने व भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.
"आन देश की शान देश की
देश कि हम संतान है
तीन रंग में रंगा तिरंगा
यही अपनी पहचान है
यही अपनी पहचान है"
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकिर यांनी ऑनलाइन राहून सदर कार्यक्रमाचे कौतुक करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत सांगितले ही शिरीष कुमार याने लहान वयात देशासाठी बलिदान दिले होते तसेच तुम्ही राष्ट्रभक्तीपर गीत गायन करणाऱ्या मुलांनो तुम्ही सर्व शिरीष कुमारच आहात सांगून मुलांचा उत्साह वाढवला.
'हे वतन' 'छोडो कल की बाते' 'भारत हमको जान से प्यारा है' या सार्या गाण्यांतून विद्यार्थ्यांमधील मातृभूमि बद्दल प्रेम व उत्कंठा दर्शवत होती.
लहान गटातून कु.खुशी नागपुरे (प्रताप विद्यामंदिर) ही प्रथम तर सुमीरा बी शेख मोहम्मद (मुस्तफा अँग्लो उर्दू स्कूल) द्वितीय व कु.प्रणाली चौधरी (महात्मा गांधी प्रा.विद्यालय) तृतीय तसेच कु.गौरी जाधव (महिला मंडळ स्कूल) हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
मोठ्या गटात कु.स्वराली पाटील (लिटिल हार्टस इंग्लिश मेडीयम स्कूल) तर कु.ऐश्वर्या शर्मा (चावरा इंग्लिश मेडियम स्कूल) द्वितीय तर कु. गुंजन देशमुख (प्रताप विद्या मंदिर)तृतीय तर उत्तेजनार्थ बक्षीस कुमारी कु.रुतुजा सोनवणे (पंकज माध्यमिक विद्यालय) यांनी पटकावले.
स्पर्धेत परीक्षकांचे काम संगीत विशारद श्री ए पी पाटील, डॉ.मयुर अग्रवाल व संदीप सोनार यांनी पाहिले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख राधेश्याम पाटील,विलास पी. पाटील व प्रदीप पाटील, चंद्रशेखर कोष्टी, विलास कोष्टी,चेतन याद्निक,राकेश सोनार,रोटे.पंकज पाटील व समस्थ रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक राधेश्याम पाटील तर आभार प्रदर्शन सचिव रुपेश पाटील यांनी केले.

No comments:
Post a Comment