Sunday, 2 August 2020

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळा दहिगाव,-जामघर,व वडवली माध्यमिक शाळेची गगन भरारी !!

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळा दहिगाव,-जामघर,व वडवली माध्यमिक शाळेची गगन भरारी !!
.
 * तालुक्यात 100 % टक्के निकालाची नोंद*

मुरबाड (मंगल डोंगरे )नुकताच जाहीर झालेल्या 10 वी च्या निकाला मध्ये मुरबाड तालुक्यातील आगरी समाजाच्या दोन शाळांचा निकाल  हा 100 % लागला असुन, आगरी समाजातील विद्यार्थ्यांनी घेतलेली हि गगन भरारी आहे असं  म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हे निकाला वरुन सिद्ध झालं आहे.यामध्ये माध्यमिक विद्यालय वडवली,व कोकण शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा दहिगाव-जामघर ह्या दोन शाळांचा समावेश आहे.
         दहिगाव-जामघर या शाळेत सन 2019-20या शैक्षणिक वर्षात एकूण 46 विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी ची परीक्षा दिली होती.ते सर्वच  46 विद्यार्थी भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाले असुन, त्यापैकी 12 विद्यार्थी 80 % टक्के गुण प्राप्त करून मेरीट मध्ये आले आहेत. तर माध्यमिक विद्यालय वडवली या शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी ची परीक्षा दिली  होती.ते सर्वच 25 विद्यार्थी यशस्वी पणे उत्तीर्ण झाले असुन 3 विद्यार्थ्यांनी मेरीट मध्ये येवून मुरबाड तालुक्यात उत्तुंग भरारी घेऊन समाजाचे नाव लौकिक केले आहे.कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी वाटचाल केल्याने सर्वच स्तरातुन घवघवीत यश मिळविणारे विद्यार्थी, पालक आणि गुरुजनांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.मात्र भविष्याची वाटचाल करताना योग्य मार्ग निवडून आज मिळालेले यश कायम टिकविणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...