म न से च्या मध्यस्थीने फ्युजो ग्लास कंपनीच्या कामगारांना मिळाला रोजगार !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोना संकटात सगळीकडे. लाँकडाऊन स्थिती असताना बहुतांश उद्योग धंदे,कारखाने, कंपन्या ह्या.बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्ग पाहता सतत वाढणारा लाँक डाऊन यामुळे उद्योग धंदे आणि बेरोजगार कामगार या दोन्ही घटकांवर अतिशय वाईट परिस्थिती ओढावली.मार्च ते जूलै या चार महिण्यांचा काळावधीत काम नाही तर पगार नाही अशी कामगारांची अवस्था झाली.गावबंदी मुळे गावा बाहेर कामधंद्या साठी जाण्यास मनाई, जाण्यायेण्यासाठी प्रवासाची साधने बंद मग घरी गावात अडकून पडलेला कामगार,ना घर का ना घाट का,अशा परिस्थितीत मुरबाड तालुक्यातील फ्यूजो ग्लास कंपनीच्या व्यवस्थापनाने चार महिण्या नंतर कामावर घेण्यास मनाई केली. ह्या. कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड तालुका शाखेसी संपर्क साधुन आपली व्यथा सांगितली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापना बरोबर चर्चा करून लाँकडाऊन परिस्थितीत कामगारांवर ओढावलेली उपासमारी आणि प्रवासाची गैरसोय लक्षात आणुन देवून, सद्य परिस्थितीत या कामगारांना कामावर घ्या त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.याशिवाय ते सर्वच स्थानिक आहेत. म्हणून कुठल्याही प्रकारची कारणे न सांगता त्यांना कामावर घ्या. म्हणून मनसे ने पुढाकार घेऊन त्या स्थानिक कामगारांना कामावर घेण्यास भाग पाडले. आणि कंपनी व्यवस्थापनाला नमते घेवून अखेर मनसेची मागणी मान्य केल्याने त्या कामगारां वर येणारी उपासमारीची वेळ आता टळली आहे, त्यामुळे मनसे चा बोलबाला होताना दिसत आहे.
मुरबाड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हि सर्वसामान्य माणसाची आधार बनली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न असो,दवाखान्याच्या प्रश्न असो,कि , सर्वसामान्य माणसाचा प्रश्न असो,नाहीतर नगरपंचायतीच्या प्रश्न असो मनसे तालुक्यात पुढे सरसावताना दिसत आहे . आणि आता मुरबाड च्या फ्युजो ग्लास कंपनीत जाऊन स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, मनसे तालुका अध्यक्ष कैलास चौधरी ,तालुका सचिव विलास चौधरी, मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले, उपतालुका अध्यक्ष भगवान घरत, तालुका अध्यक्ष गणेश साबळे, यांनी या कंपनीबरोबर चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

No comments:
Post a Comment