Wednesday, 5 August 2020

रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील गोरेगावनजीक सोन्याच्या वाडीत घुसले पुराचे पाणी, १०० हून अधिक लोक अडकले पुराच्या पाण्यात !

रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील गोरेगावनजीक सोन्याच्या वाडीत घुसले पुराचे पाणी, १०० हून अधिक लोक अडकले पुराच्या पाण्यात !


"स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासह रेस्क्यू टीम दाखल, बचावकार्य सुरु"

     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या   माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात असलेल्या सोन्याच्या वाडीत पुराचे पाणी शिरले आहे. या वाडीला पुराव्या पाण्याने वेढा दिल्याने, जवळ जवळ शंभर लोक अडकून पडले आहे. त्यांना वाचविण्यासाठी प्रशांत साळुखे यांची रेस्क्यू टीम येथे दाखल झाली असून, बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. 
     संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रायगडकरांची दाणादाण उडवली आहे. महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी, माणगाव तालुक्यातील काळ या नद्यांनी आपले पात्र सोडल्याने महाड, माणगावमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात असलेल्या सोन्याच्या वाडीला आज ०५ ऑगस्ट पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे सोन्याच्या वाडीतील वाडीतील सुमारे १०० लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासह, रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. प्रशांत साळुखे यांची आठ जणांची रेस्क्यू टीम बोटीद्वारे अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. तर स्थानिक प्रशासनही घटनास्थळी तळ ठोकून आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...