मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी,मात्र बारवी डॅम रिकामाचं! भिसोळ येथे घरांची भिंत कोसळली, कल्याण मुरबाड रस्त्याची चाळण ?
कल्याण (संजय कांबळे) : प्रथम संततधार आणि रात्री पासून पडणा-या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. असे असले तरी अनेक शहरे आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवणारा बारवी डॅम मात्र केवळ ५०%भरला आहे या पावसामुळे कल्याण तालुक्यातील भिसोळ गावातील एका घरांची भिंत कोसळली आहे तर कल्याण मुरबाड महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
गेले कित्येक दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाचा हुकमाचा महिना मानला गेलेला जुलै बहुतांशी कोरडाच गेला त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती. मागील वर्षी ५आॅगस्ट रोजी शहरी आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅम ओव्हरफ्लो झाला होता. तो आॅगस्ट मध्ये भरेल असा विश्वास बारवी डॅम च्या अधिका-यांनी. व्यक्त केला होता. सुदैवाने हवामान विभागाने चार पाच दिवस कोकण, ठाणे, मुंबई पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला होता. त्यानुसार कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर कर्जत, अंबरनाथ बदलापूर आदी परिसरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे इतके दिवस तळ गाठलेली उल्हास नदी तुडूंब भरून दुथडी. वाहू लागली. पण तरीही बारवी डॅम मात्र केवळ ५० टक्के भरला आहे. अजून साडेसात फुट डॅम रिकामा आहे.
या पावसामुळे तालुक्यातील भिसोळ गावातील बारकुबाई भाऊ ठाकरे हिच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. हे पहिले गावात राहत होते. काही दिवसांपूर्वीच येथे राह्याला गेले होते. जिप शाळेच्या मागे डोंगरांच्या बाजूला हे घर होते. तलाठी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला आहे. परंतु या पावसाने ठेकेदारांचे पितळ उघडे पाडले. कल्याण मुरबाड महामार्गावर शहाड उड्डाणपूल ते म्हारळ पाडा असे अनेक खड्डे पडले आहेत तर म्हारळपाडा, वरप, टाटा पॉवर हाऊस, कांबा, पांजरपोळ, पावशेपाडा, गोवेली, आदी ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आता पाऊस थांबला असला तरी त्याच्या खुणा मात्र या रस्त्यावर दिसत आहेत.

No comments:
Post a Comment