Tuesday, 18 August 2020

"मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये तात्काळ व्हेंटिलेटरची संख्या वाढवुन एम. डी. ( विशेषतज्ज्ञ) वैद्यकीय अधिकारी तात्काळ उपलब्ध करावेत" महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची आरोग्य प्रशासनाकडे मागणी ! !

"मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये तात्काळ व्हेंटिलेटरची संख्या वाढवुन एम. डी. ( विशेषतज्ज्ञ) वैद्यकीय अधिकारी तात्काळ उपलब्ध करावेत" महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची आरोग्य प्रशासनाकडे मागणी ! !     
 
      
मुरबाड {मंगल डोंगरे} : मुरबाडमध्ये असलेल्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये तात्काळ व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी व या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये तात्काळ त्यासाठी एम. डी. डॉक्टरही उपलब्ध करावेत. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी मुरबाडच्या आरोग्य प्रशासनाकडे केली आहे.     

     
मुरबाड  शहरातील व तालुक्यातील अनेक कोरोना रुग्णांना त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली की ,मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. परिणामी अशा रुग्णांना कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, मुंबई या ठिकाणी पुढील उपचारासाठी जावे लागते. सध्या मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची मशीन पडून आहे, कारण सदर व्हेंटिलेटरची प्रक्रिया कार्यवाहीत करण्यासाठी एम. डी. (विशेषतज्ज) डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र सध्या या हॉस्पिटलमध्ये त्याबाबत  कोणत्याही प्रकारचा एम. डी. डॉक्टर उपलब्ध नाही. सदरबाबत माहिती घेतली असता, आरोग्य प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. मुरबाड तालुक्यातील अनेक कोरोना रुग्णांना शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने परिणामी पुढचा रस्ता पकडावा लागतो. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन मुरबाडकरांसाठी नेहमीच 'जिथे कमी तिथे विद्यार्थी सेनेची हमी' या ब्रीदानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धडाडीचे डॅशिंग मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी नुकतच आपल्या मनसैनिकांना बरोबर घेऊन "लवकरात लवकर मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी व त्यासाठी तात्काळ एम. डी. डॉक्टर उपलब्ध करावेत" अशी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ, गटविकास अधिकारी रमेश अवचार , तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे, तसेच कोविड हॉस्पिटलच्या अधिष्ठाता नम्रता कुलकर्णी यांच्याकडे  मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आजीम मानियार, राज चौधरी, उमेश सोनावणे, ऋषीकेश तेलवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.जर लवकरात व्हेंटिलेटरची संख्या वाढविली व एम. डी. डॉक्टर उपलब्ध झाले तर मुरबाड तालुक्यातील रुग्णांचा मनस्ताप वाचेल अशी प्रतिक्रिया देवेंद्र जाधव यांनी आमचे मुरबाड तालुका प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !! ** उचल वजा करून मिळणार रक्कम, मागणी अखेर मान्य उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : ...