Tuesday, 18 August 2020

केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन....

केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.... 


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाने सन २०२० च्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  
       दिव्यांग व्यक्तींना सन-२०२० चे पुरस्कारासाठीचे अर्ज दि. ७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२० या  कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच हे अर्ज केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या WWW.DASABILITYAFFAIRS.GOV.IN या वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. अर्जदारांकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण माहिती व अर्ज दि.२२ ऑगस्ट २०२० पूर्वी स्वीकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. हे अर्ज दि.२५ ऑगस्ट २०२० पूर्वी आयुक्तालयात सादर करावयाचे असल्याने आहेत.  
      राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे :- उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती.   उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था. दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था. प्रथितयश व्यक्ती (रोल मॉडेल). दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी उद्देशाने केलेल्या उत्कृष्ट संशोधन/उत्पादन निर्मिती.  दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळाविरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/संस्था.   दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा.  राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती. उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक. उत्कृष्ट ब्रेल कारखाना. उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी दिव्यांग व्यक्ती. 
        या पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज  इंग्रजीत किंवा हिंदीमध्ये तीन प्रतीत मुदतीच्या आत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे सादर करावेत, असे समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कामगार नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा !

कामगार नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा ! खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशा...