Tuesday, 4 August 2020

इंदिरानगर, कल्याण येथील समाजसेवक सुरेश सावंत यांचा नातू सार्थक याचा वाढदिवस उत्साहात साजरा !!

इंदिरानगर, कल्याण येथील समाजसेवक सुरेश सावंत यांचा नातू सार्थक याचा वाढदिवस उत्साहात साजरा !!


कल्याण, प्रतिनिधी : इंदिरा नगर, बिर्ला कॉलेज, कल्याण परिसरातील समाजसेवक सुरेश सावंत यांच्या नातु सार्थक याचा २रा वाढदिवस अत्यंत उत्साहात पण सर्व नियम पाळून साधेपणाने साजरा करण्यात आला.
इंदिरानगर, कल्याण येथे अनेक वर्षे वास्तव्यास असलेले सुरेश सावंत हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार असून आपले काम सांभाळून परिसरात राहणाऱ्या शेजारी, इतर कुटुंबांना कधीही कोणती अडचण आली तर नेहमीच त्यांच्या सोबत उभे राहिले व शक्य असेल ती मदत केली. असेच हे सुरेश सावंत बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेले भिमसैनिक आहेत.
यांचाच वारसा यांचे तिन्ही पुत्र मंगेश, सिध्दार्थ, आकाश हे सुध्दा समाजाप्रती त्यांचे काही योगदान आहे असे समजून सामाजिक उपक्रमात सामील असतात.
भिमसैनिक सुरेश सावंत यांनी त्यांचा जेष्ठ पुत्र मंगेश याचा मुलगा सार्थक हा दोन वर्षांचा झाला या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत त्याचा वाढदिवस साधेपणाने पण मोठ्या उत्साहाने साजरा केला. या निमित्ताने कुटुंबातील सर्व जण सार्थकचे आई-वडील  प्रिया-मंगेश, आजी-आजोबा इंदुबाई-सुरेश, आत्या - कोमल, आम्रपाली, राजश्री, धनश्री. भावोजी - श्याम, राहुल, अजय. काका - सिध्दार्थ, आकाश. बच्चेकंपनी - सांची, रोचिष्णु, सिध्दार्थ, पिल्लू उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...