Tuesday, 4 August 2020

महाराष्ट्राचा महागायक ठरलेल्या महेश कंटे यांनी लाॅकडाऊण काळात जपली सामाजिक बांधिलकी !!

महाराष्ट्राचा महागायक ठरलेल्या महेश कंटे यांनी लाॅकडाऊण काळात जपली सामाजिक बांधिलकी !!


कल्याण (संजय कांबळे) : अजानते वयात पडलेली जबाबदारी ही संधी समजून तिचे सोन करताना पुढे आर्थिक बकासुर उभा राहिला पण गावातील लोकांनी पै अन पै जमा करून हा राक्षस दुर पिटाळून लावला. मग मात्र कितीही अडचणी, समस्या, प्रश्न आडवे आले तरी त्यावर जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा चतु :सुत्रीच्या जोरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका खेडे गावातील मुलगा पुणे सारख्या विद्येच्या माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहरात" महाराष्ट्राचा महागायक" म्हणून घोषणा होते. ही ऐतिहासिक घटना ठाणे जिल्ह्याकरिता विशेषत मुरबाड तालुक्या साठी सुर्वणाक्षरानी लिहून ठेवण्यासारखी आहे. आणि हे क्षण दाखवले ते म्हसा गावापासून काही अंतरावर असलेल्या चिरड या खेडेगावातील महेश कंटे यांनी!
लाॅकडाऊण काळात 'भेट सेलिब्रिटींची' या मथळ्याखाली आमचे प्रतिनिधी संजय कांबळे यांनी रियालिटी शो मध्ये मुरबाड तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या महाराष्ट्राचा महागायक महेश मधूकर कंटे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या कडून उलगडलेल्या घटना, प्रसंग. खास ग्रामीण भागातील तरुण पिढीसाठी
स्वतंत्र काळात  इंग्रज सत्तेविरोधात रान उठविणारे आणि क्रांतीचे केंद्र ठरलेल्या मुरबाड कर्जत तालुक्यातील वीरभाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील व त्यांचा आझाद दस्त्यामधील इतर सहकां-याचे जिथे रक्त सांडले आणि घटनाकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असलेले आंबेटेंभे अशा ऐतिहासिक पावनभूमित चिरड या अगदी छोट्या गावात महागायक महेश कंटे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अंत्यत हलाकिची, पण गावात धार्मिक वातावरण चांगले असल्याने भजन किर्तन होत होते. अगदी दोन ते तीन वर्षांपासून महेश याला भजनाची आवड होती. प्रसाद मिळतो म्हणून तो न चुकता गावातील या कार्यालयाला हजर असायचा. यावेळी त्याला माहीत नव्हते की या भजनामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल. आणि त्याच्या जीवनात एक घटना घडली. चौथी ते आठवी च्या दरम्यान गावात भजनाचा कार्यक्रम सुरू असताना जो मुख्य गाणारा होता त्याचा आवाज अचानक खराब झाला. व ते गाणं पुढे एकसारखे गाण्यासाठी महेश याला बोलावण्यात आले. तो ही न घाबरता इतका सुंदर गायला की उपस्थित सर्वानी त्याचे कौतुक केले. येथून ख-या अर्थाने महेश कंटे याचे गाणे सुरू झाले. पण याच काळात महेश चा आवाज फुटला त्यामुळे तो नाराज झाला व त्याने काही काळ गाणे थांबवून रियाज करायला सुरुवात केली 
यांनतर म्हसा येथील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेण्यास आग्रह झाला यामध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स दिला की काॅलेज तरुण तरुणींनी महेश याला डोक्यावर घेतले. 
दरम्यान आता महेश याला शास्त्रोक्त पद्धतीने संगीत शिक्षण घेण्याची गरज भासू लागली. त्यामुळे त्याने म्हसा येथील भाऊ बुवा कुर्ले यांच्या कडे एक वर्ष संगीत शिक्षण घेतले हे घेत असताना महेशवर पुणे येथील पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या गायनाने जादू केली. त्यामुळे आपणास हेच गुरु मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु आर्थिक संकट उभे राहिले. त्यातच पुणे येथे राहणे म्हणजे भंयकर खर्चाचे, यातूनही मार्ग काढत मुरबाड तालुक्याची आंळदी येथे आश्रमशाळा आहे तेथे राहण्याची व्यवस्था करुन तेथून पुणे येथे गाणे शिकण्यासाठी ये जा करावी लागणार होती. याकरिता पैशाची गरज होती. पण महेश कंटे यांच्या चिरड गावातून घराघरातून मदत मिळाली. व ही अडचण दूर झाली.
अंनत अडचणींना तोंड देत मग पंखा, पाणी, झोपण्याची अडचण याची तमा न बाळगता संगीत शिक्षणाला सुरुवात केली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या कडे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत शिक्षण घेतले. यावेळी गावातून काळुराम मुरबाडे हे हार्मोनियम घेऊन पुण्याला आले.तसेच ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील महिला मंडळ यांचा उत्साह व पाठिंबा बघून आपणही गावासाठी, तालुका, जिल्हा करिता काहीतरी करायचे असा निश्चय केला. बघता बघता चार वर्षे संगीत शिक्षण पूर्ण झाल्यावर महेश गावी आला. पण येथे वाहतूक व्यवस्था, फोनला रेंज नसल्याने अडचणी येवू लागल्याने तो बदलापूर वांगणी येथे राहण्यासाठी गेला तो विविध टिव्ही वरील रिअॅलिटी शो बघायचा त्यावेळी ई टिव्ही मराठी वर गौरव महाराष्ट्राचा हा संगीत कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी तो सांताक्रूझ येथे आॅडिशन ला गेला. पण सिलेक्शन झाले नाही. त्यामुळे तो खूपच निराश झाला. तीन दिवस तो घरातून बाहेर पडला नाही. चौथ्या दिवशी मी मराठी टिव्ही चॅनेल मधून फोन आला. की ठाणे येथे आॅडिशन ला या. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आंनद शिंदे आणि गायिका साधना सरगम यांच्या समोर महेशने दमदार गाणे सादर केले. आणि महेश कंटे यांच्या यशाचा मार्ग मिळाला.
मेगा आॅडिशन झाली तेथे निवड झाली. पहिल्या भागालाच महाराष्ट्राच्या नामांकित गायिका आशा भोसले या उपस्थित राहिल्या आणि त्यांच्या समोर गुंतता हृद्य माझे हे नाट्य गीत महेश ने सादर केले व चमत्कार झाला. आशाताई उभे राहून मेहेश ला आशिर्वाद दिला. तेथेच तो जिंकला होता. या शोमध्ये अॅकंरिंशग अभिनेत्री रेणुका शहाणे या करित होत्या तर जज म्हणून आंनद शिंदे व साधना सरगम यांच्या कडे होते. याची फायनल पुणे येथे आयोजित केली होती. यामध्ये महमंद आयाझ (सोलापूर) प्रल्हाद जाधव (कोल्हापूर) आणि महेश कंटे (ठाणे) असे तीन स्पर्धक होते. तर या सोहळ्यास जेष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, शंकर महादेवन आणि गायक शान, अभिनेत्री वर्षा उचगावकर, उपस्थित होते महाराष्ट्राचा महागायक कोण होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ठाणे जिल्ह्यातून हजारो लोक पुणे येथे गेली होती. अखेरीस गायक शान यांनी आवाज महाराष्ट्राचा या शोचा विजेता ब्रम्हा विष्णू व महेश असे बोलून महेश कंटे याला महाराष्ट्राचा महागायक म्हणून विजेता घोषित केले. आणि ठाणे जिल्ह्यात दिवाळी साजरी झाली. 
तर विजयी ट्राफी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते देण्यात आली. 
या विजयाचे श्रेय कोणाला असे महेश ला विचारले असता तो म्हणाला, प्रथम माझे गावकरी,  सामाजिक व राजकीय नेते माझे गुरू आणि सर्व जनता ज्यांनी मला भरभरून एस एम एस पाठवले होते. यांनतर सुर नव्या युगाचा या झी मराठी वाहिनीवरील शो चा उपविजेता ठरला. यश भरपूर मिळाले पण आता खरी कसोटी महेश कंटे यांची होती 
कारण राज्यात कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर परिस्थिती निर्माण होत होती. अशा वेळी शासकीय यंत्रणा बरोबरच आपली जबाबदारी ओळखून कोरोनोच्या काळात घराबाहेर न पडणे, सोशलडिस्टींग, मास्क वापरावे, हातपाय स्वच्छ धुने आदी जनजागृती करण्यासाठी महेश यांनी सर्व मित्र, नातेवाईक, प्रेमकरणारी मंडळी यांना सर्वांना फोन व्दारे, एस एम एस आदी माध्यमातून काम केले. 
यावेळी महेश कंटे यांना विचारले असता ते म्हणाले माझे आदर्श जेष्ठ गायक हरिहरण असून त्यांच्या पासून उर्जा मिळते. तर आजच्या सोशलमिडयावर निर्माण झालेल्या गल्ली बोळातील गायक आणि संगीतकार यांच्या विषयी वाईट वाटते असे सांगून नाराजी व्यक्त केली यामुळे चांगले गायक तयार होणार नाही अशी भिती व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...