Monday, 3 August 2020

मुंबईत सर्व दुकाने ५ ऑगस्ट पासून उघडण्याचा निर्णय, पण नियमांचे पालन करून : मुंबई महानगरपालिका !!

मुंबईत सर्व दुकाने ५ ऑगस्ट पासून उघडण्याचा निर्णय, पण नियमांचे पालन करून : मुंबई महानगरपालिका !!


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकानं ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारीच ही बातमी ठरली आहे.

मुंबईतील सर्व दुकाने, बाजार हे परवापासून म्हणजेच ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरु असणार आहेत. यामध्ये मद्य विक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. एवढंच नाही तर मद्य हे घरपोचही देता येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केला तर कारवाई केली जाणार आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मॉलमधली सिनेमागृहं बंद राहणार, फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...