Monday, 3 August 2020

टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाचे २,५०० कोटी रुपयांचे नुकसान !!

टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाचे २,५०० कोटी रुपयांचे नुकसान !!


मुंबई : टाळेबंदीमुळे  राज्यातील एसटीलाही मोठय़ा प्रवासी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. टाळेबंदीआधी एसटीला दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु गेल्या चार महिन्यांत एकू ण २,५०० कोटी रुपये उत्पन्नाला मुकावे लागले आहे. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांचे वेतनही देणे कठीण झाले आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यातील काही भागांत एसटीची सेवा तालुका ते गाव ते तालुका सुरू करण्यात आली. तर मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त खासगी कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा दिली. परंतु यातून के वळ दररोज २५ ते ३० लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न मिळत आहे. करोनाच्या धास्तीने राज्यातील एसटी सेवेलाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एसटीची लांब पल्ल्याची सेवा बंद आहे. त्यामुळे गणेशोत्सवात काही प्रमाणात एसटी सुरू के ल्यास थोडेफार उत्पन्न तिजोरीत जमा होऊ शकते.

'राज्यांतर्गत एसटी सेवा अटींसह सुरू करा' : महामंडळाची राज्य शासनाकडे मागणी

राज्यांतर्गत एसटी सेवा बंद आहे. मात्र ई-पास घेऊन खासगी बस गाडय़ांना राज्यांतर्गत प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे एसटी बंद ठेवून नुकसान होऊ नये यासाठी राज्यांतर्गत एसटी सेवा अटींसह सुरू करण्याची परवानगी महामंडळाने राज्य शासनाकडे मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणमध्ये तेथील राज्य परिवहन सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. सरकारने नियमांसह राज्यांतर्गत एसटी सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...