Tuesday, 5 January 2021

मुरबाडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ! **44 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध **

मुरबाडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी !

**44 पैकी 5  ग्रामपंचायती बिनविरोध **


**39 ग्रामपंचायती मध्ये रंगणार निवडणूकीचा सामना ** 

मुरबाड - (मंगल डोंगरे) : येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या मुरबाड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुकासाठी मुरबाड मधून 769 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननी मध्ये किती अर्ज वैध ठरले ही माहिती मिळु शकली नाही. मात्र 338 जागांपैकी काल माघारीच्या दिवसापर्यंत 178 जागांवरील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. परंतु 160 जागांवर निवडणूक होणार आहे. 
एकंदरीत तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीपैकी 5 ग्रामपंचायती व 46 प्रभाग बिनविरोध झाले असून 87 प्रभागात 160 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 

तालुक्यातील शेलारी, डेहणोली, आगाशी, कलमखांडे, मासले (बेलपाडा) या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

तालुक्यात 160 जागांसाठी 39 ग्रामपंचायती मध्ये 87 मतदानकेंद्रातून निवडणूक होणार आहे.

त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी400 कर्मचारी, 15 झोनल अधिकारी यांची नेमणूक केली आहे. 
कर्मचारी, झोनल अधिकारी यांच्या जाण्या येण्यासाठी 45 जीप व 5 बसेस ची सोय केली असून निवडणुकीची तयारी 90% पूर्ण झाली असल्याची माहिती तहसिलदार अमोल कदम यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...