एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या नवीन मराठी गाण्याचे पश्चिम महाराष्ट्रतून तूफान स्वागत !!
कल्याण (संजय कांबळे)ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी निर्माण करण्यात आलेल्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या वतीने तयार केलेल्या 'दिलाय तिघींनी मला धोका' या नव्या कोऱ्या गाण्याचे पश्चिम महाराष्ट्रतून तूफान स्वागत होत असून तसे ग्रामस्थांनी बॅनर लाऊन त्याचे उद्घाटन देखील केले.
जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संस्था संस्थेचे अध्यक्ष पत्रकार संजय कांबळे यांनी कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आदी ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेची स्थापना केली. या आधी त्यांनी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. यामध्ये प्रशांत दामले, विजय पाटकर, जयवंत वाडकर मंगेश सातपुते , कै निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, चला हवा येऊ दे फेम विनोदवीर कुशल बंद्रिके, भूषण कडू, लावणी क्विन विजया पालव, लेखक दिग्दर्शक एकनाथ देसले, शांताबाई फेम सिधू गायकवाड, आदीचां समावेश आहे. यांच्यासह अनेक थोरामोठ्यांच्या सूचनेनुसार गीतकार शिवाजी पवार यांनी लिहिलेल्या 'दिलाय तिघींनी मला धोका हे गीत स्वत संगीतबद्ध करुन महाराष्ट्राचा बुंलद आवाज शिंदेशाही घराण्यातील प्रसिद्ध गायक समर्थक शिंदे यांच्या बहारद आवाजातून गाऊन घेऊन रेकॉर्डिंग केले यांचे. शुंटिग नुकतेच माळशेज घाट परिसरात पुर्ण केले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सिधू गायकवाड (शांताबाई फेम) साक्षी पाटेकर, दिव्या गायकवाड गौरी पाटील वैष्णवी धायगुडे बालकलाकार हिंमाशू कांबळे तसेच पुणे सातारा जिल्ह्यातील मोहसीन जमादार, रोहित सकटे सुरेश वाडकर आणि नामदेव बल्लाळ यांनी चांगला अभिनय व डांन्स केला आहे. यांचे यांचे उद्घाटन आज सातारा जिल्हातील बेलवडे बुद्रूक येथे शिवाजीराव मोहिते, अध्यक्ष, कराड दक्षिण काॅग्रेस सेवा दल यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर ला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी त्याच्या हस्ते येथील टिमचे प्रमुख नामदेव बल्लाळ, मोहसिन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर दयानंद वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान मोहिते (इंजिनिअर) प्रदिप भोसले, किरन मोहिते सयाजी सकटे, चंद्रशेन मोहिते सचिन मोहिते, (माजी सरपंच) सभांजी मोहिते मुकबल मुल्ला, लाला मुल्ला, आनंदा साळुंखे, जयकर मोहिते, संजय पवार, आंनदा मांडले, अनिल वडार संदिप मोरे, दिनेश मोहिते, महादेव लोहार, सूरज मोहिते, पापामिया जमादार, नाशीद शेख, जानेश मुल्ला महादेव कुंभार, आकाश पवार, संतोष मोहिते, दिलावर पटेल, संदिप धोत्रे, विजय वडार वाजिर शेख, शाहिद शेख, व गीतकार शिवाजी पवार उपस्थित होते.
सध्या कराड, सातारा, सांगली, शिराळा, वाळवा, इस्लामपूर कोकरुड आदी पश्चिम महाराष्ट्रातील २ते ३हजार गावातील एन ऐ परिवार या टिव्ही चॅनेलवर हे नवीन गाणे धुमाकूळ घालत असून लहानांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींच्या पंसतीला ते उतरत आहे. त्यामुळे प्रत्येक २५ मिनिटानंतर हे गाणे टिव्ही वर प्रसारित होत आहे. एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर खाली निर्माण झालेल्या या नवीन गाण्याच्या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख संजय कांबळे यांनी टिमचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नामदेव बल्लाळ मोहसीन जमादार रोहित सकटे,, सुरेश वाडकर, दयानंद वाघमारे यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.


No comments:
Post a Comment