ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणमैदानातुन 748 उमेदवारांपैकी आज कोण मैदान सोडणार ? कोण लढणार ?
मुरबाड, (मंगल डोंगरे) : 15 जानेवारी रोजी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे रणधुमाळीत राजकीय पक्षांचे वर्चस्व कायम रहावे म्हणुन आपले अस्तित्व दाखविण्यासाठी अनेक उमेदवारांनी गावपातळीवरील निवडणुकीत सहभाग दाखवला असुन दि. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान एकुण 748 उमेदवारांनी दंड थोपटले असुन कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा गावपातळीवरील पॅनेलला आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश आल्याने आज होणाऱ्या माघार मध्ये राजकीय दबावामुळे व आपसातील समझोत्याने कोण रणमैदानातुन पळ काढते व कोण कोणाशी दोन हात करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मध्ये 3 प्रभागांमध्ये निवडुन येणाऱ्या 7 सदस्य संख्या असणाऱ्या 30 ग्रामपंचायत 9 सदस्य असणाऱ्या 13 ग्रामपंचायत व 11 सदस्य असणारी राष्ट्रीय महामार्गावरील सरळगाव ग्रामपंचायत असे 338 सदस्य निवडून देण्यासाठी 15 जानेवारी रोजी निवडणुका होत असुन त्यासाठी 47291 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान गावपातळीवरील होणाऱ्या या निवडणुकीत आपल्या भाऊबंदकीत तसेच सारख्या नातलगा मध्ये असणारे सलोख्याचे संबंध विसरुन ग्रामपंचायत वर माझे आणि माझ्या पक्षांचे वर्चस्व रहावे म्हणुन ते सलोख्याचे संबंध विसरुन, आपसात केवळ खुर्ची साठी लढणे त्यासाठी एक एकर गेली तरी बेहत्तर परंतु एक मत पाच हजार रुपयांना विकत घेऊन मी सरपंच पदावर विराजमान होणार. परंतु या वेळी राज्य निवडणुक आयोगाने सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही निवडणुकी नंतर घेणार असे आदेश दिले असल्याने आपण निवडून आलो तर कदाचित सरपंच होऊ शकतो. या अपेक्षेने तो या निवडणुकीचे रणधुमाळीत साम दाम दंड भेद या त्रिसुत्राने निवडणुकीचे रणमैदानात उतरला असल्याने आज होणाऱ्या माघार मध्ये कोण आपसातील सलोख्याचे संबंध जोपासतो. कोण गावपातळीवरील पॅनेलचा विचार करतो, कोण राजकीय दबावाला बळी पडतो व आपली उमेदवारी मागे घेऊन निवडणुकांचे रणमैदानातुन पळ काढतो या कडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी राजकीय पक्षांचे समाज कार्यामुळे व सामाजिक संघटनांचे न्याय निवाडा पध्दतीने जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध विरोध झाल्या तर निवडणुकांसाठी उमेदवारांचा नाहक खर्च वाचेल व गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहुन गावात शांततेचे वातावरण निर्माण होऊन गाव तंटामुक्त पुरस्काराकडे वाटचाल करील. यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात कोण यशस्वी होते अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये वर्तविण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment