Sunday, 3 January 2021

टिटवाळा येथे स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ संपन्न !

टिटवाळा येथे स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ संपन्न !


प्रकाश संकपाळ : 

टिटवाळा - सोशल डिस्टंसिंग व सुरक्षिततेचे नियम पाळून शिवगौरी अपार्टमेंटमध्ये स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाचा उद्धाटन समारंभ नुकताच पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंडळाच्या संचालक अध्यक्षा सौ. सुप्रिया संदीप आचरेकर यांनी मंडळाचे ध्येय, उद्दिष्टे व पुढील वाटचाली बाबत सविस्तर माहिती दिली. स्त्री सक्षमीकरण, स्त्रीयांसाठी रोजगार निर्मिती, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाची वाटचाल राहील असे त्यांनी नमूद केले. मंडळाच्या स्थापनेपूर्वीच स्त्रियांना रोजगार देऊन, परिसरातील आश्रमशाळांना भेट देऊन मंडळाने अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सुरू केलेले आहेत. मंडळाचे पुढील उद्दिष्ट हे सक्षम बचत गट तयार करून त्याद्वारे महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या उद्धाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी हेल्थकेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव मनीषा गांगुर्डे व मातोश्री उद्योग समूहाचे CMD श्री. रुपेश पारधी हे उपस्थित होते.

दरम्यान टिटवाळा शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकारणी मंडळातील महिला पदाधिकारी  सौ.मनीषा माने, सौ. संतोश्री नितीन गोसावी सौ. संपदा कदम, सौ दिशा खाडे, सौ चारुशीला कडव, श्रीमती मनीषा अग्निहोत्री व इतर महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.

No comments:

Post a Comment

आनंद नगर मधील नागरी समस्या प्राधान्याने सोडवा शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !

आनंद नगर मधील नागरी समस्या प्राधान्याने सोडवा शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !          उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण शह...