पत्रकारिता व लेखन क्षेत्रातील विशेष योगदान: वृत्तपत्रलेखक व आदर्श वार्ताहरचे संपादक पंकजकुमार पाटील कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे स्मृती पत्रभूषण व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित !
मुंबई : अभिजीत राणे युथ फौंडेशन आयोजित वृत्तपत्रलेखन, गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगाव (पश्चिम) मुंबई येथील केशव गोरे ट्रस्ट हॉल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी कांजुरमार्ग -मुंबई येथील वृत्तपत्रलेखक व पाक्षिक "आदर्श वार्ताहर" चे संपादक पंकजकुमार पाटील यांना पत्रकारितेतील व सामाजिक योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठी बिग बॉस फेम सुप्रसिद्ध गगनभेदी व्यक्तिमत्व श्री अनिल थत्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल गलगली, धडक कामगार युनियनचे अध्यक्ष व आयोजक श्री अभिजित राणे, माजी नगरसेवक श्री विनोद शेलार, जेष्ठ राजकीय समीक्षक श्री अशोक राणे, दैनिक मुंबईच्या संपादिका सौ अनघा राणे, वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत व अगदी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धाप्रमुख, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,समाजसेवक गणेश हिरवे यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच वृत्तपत्रलेखक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment